महावितरण मध्ये ईडब्ल्युएस प्रवर्गातुन उपकेंद्र सहायक पदावर निवड होऊन पण नियुक्ती न भेटलेल्या 235 उमेदवारांच्या एका ग्रुप ने आज टिपू सुलतान ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
व त्यांच्या सोबत होत असलेल्या अन्यायाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
महावितरण अंतर्गत उपकेंद्र सहायक पदाची जाहिरात दि. 05/07/2019 रोजी प्रसिद्ध झाली, लेखी परीक्षा दि. 25/08/2019 रोजी संपन्न झाली,
परीक्षेचा निकाल दि. 28/06/2020 रोजी घोषित करण्यात आला आणि मंडळनिहाय यादी दि. 24/11/2020
रोजी लावण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी दि. 1 आणि 2 डिसेंबर, 2020 या दोन दिवशी करून घेण्यात आली.
कोरोना महामारीने उदभवलेल्या परिस्थितीमुळे कागदपत्र पडताळणीत वेळोवेळी विलंब होत गेला.
कागदपत्र पडताळणी नंतर इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
परंतु ईडब्ल्युएस प्रवर्गातील उमेदवारांना अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही.
व त्यासंदर्भात महावितरणकडून कोणतीही माहिती संकेतस्थळावर दर्शविण्यात आली नाही.
त्यामुळे ईडब्ल्युएस प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती कधी मिळणार याबाबत उमेदवार संभ्रमात आहेत.
महाराष्ट्र शासनाने दि. 23/12/2020 च्या शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गाचा समावेश ईडब्ल्युएस प्रवर्गात केला आहे.
सदरील शासन निर्णयात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करने बाबत कोणताच उल्लेख नाही.
परंतु महाराष्ट्र शासनाने दि. 31/05/2021 च्या शासन निर्णयात एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्युएस चा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा,
अशी सुधारणा करून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
यामुळे ईडब्ल्युएस प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती रखडली.
या उमेदवारांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 235 कुटुंबांचा जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
त्यामुळे इतर प्रवर्गातील उमेदवारांना ज्याप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या,
त्याप्रमाणेच ईडब्ल्युएस प्रवर्गातुन निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती या उमेदवारांनी केली.
टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर यांच्या मार्फत त्यांची
ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डाॅ. ज़हीरूद्दिन पठान सरांना निवेदन देण्यात आले.
या वेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड शहर अध्यक्ष ज़करिया इनामदार आणि नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतून निवड झालेले उमेदवार - एहतेशाम शेख,
अजमत पठाण, अनसार खान, तेजस महाजन, वसीम खान, अमरजीत सिंग, नवजोतसींग (नांदेड), मोसीन शेख, अय्युब शेख, रिजवान सय्यद, ऐनउल्ला (देगलूर),
मुख्तार सय्यद (बिलोली), रमझान शेख (हिमायतनगर), इदरीस सय्यद (लोहा), समीर खान पठान (तामसा), शेख रिजवान (भोकर), शेख सलमान शेख हफीज, शामसिंग (यवतमाळ) उपस्थित होते.