Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक 24जुलै 2021रोजी पुर्णा येथील विहारात वंदनेच्या कार्यक्रमास ऊपस्थित होतो.ठीक 12.30 वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून किमान पाचशे च्या वर स्त्री पुरूष ऊपासक हजर होते


दिनांक 24जुलै 2021रोजी पुर्णा येथील विहारात वंदनेच्या कार्यक्रमास ऊपस्थित होतो.

ठीक 12.30 वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून किमान पाचशे च्या वर स्त्री पुरूष ऊपासक हजर होते.

भदन्त डाॅक्टर ऊपगुप्त महाथेरो यांनी फक्त त्रीशरण आणि पंचशील प्रदान केले.पुढे ऊपस्थित ऊपासक/ऊपासिकांनी अत्यंत शांतपणे एक शिस्त आसनात आणि एक सुरात संपुर्ण वंदना घेतली.

हा एक तास कसा निघुन गेला कळलेच नाही. 


महाथेरो ऊपगुप्त यांनी अत्यंत शिस्तबद्द ऊपासक वर्ग घडवला तो मला अनुभवता आला.मला भावला.या पध्दतीने असाच व्यापक  प्रमाणात ऊपासक संघ घडवला गेला तर भविष्यात समाज बौध्द धम्माच्या पायाभुत संस्काराप्रमाणे तयार होईल यात शंका नाही. 


फार पुर्वी नांदेड च्या आंबेडकर नगरातील त्रिरत्न विहारात सुजाता महीला मंडळ आणि ऊपासक संघ तयार झाला होता पण आता त्याची पडझड झाली,

नंतर मी पुर्णा येथे एवढा शिस्तबद्दरित्या धम्माचरण करणारा ऊपासक ऊपासिका संघ अनुभवला.मला त्यांचा फार आनंद झाला.

या प्रसंगी महाथेरो ऊपगुप्त यांनी माझा,किरण धोंगडे, नारायणराव पिसाळ,डि वाय एस पी राठोड,आदींचा सत्कार केला.विषतः मला गौरवान्वीत केले.

याच कार्यक्रमांत जेष्ठ रिपब्लिकन नेते मा.प्रकाश दादा कांबळे,ऊत्तम प्रकाश खंदारे ऊपनगराध्यक्ष,अशोकराव कांबळे संविधान गौरव समीतीच्या वतिने माझा गौरव केला.

मा. प्रकाश दादा कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी समविचारी मित्रत्व हे राजकीय मतभिन्नते पेक्षा किती तरी मोठे असते हे त्यांच्या दिल्लेर पणाने दाखवुन दिले.

त्यांच्या मित्रत्व प्रेमात फार वर्षा पासुनच आहे यातच मी स्वतःला धन्य समजतो.


पुर्णा येथी प्रशस्त विहार शांत आणि स्वच्छ परिसर मला भावले.बुध्दगयेच्या बोधी वृक्षाचा बोधीवृक्ष बहारदार पणे डौलत आहे.

बोध्दी वृक्षाखाली बुध्द प्रतिरूप स्थापिले असुन तेथे धुप दिप पुजा करून बोधीवृक्षाचे पावित्र्य भंतेजी काळजी पुर्वक जपतात आणि येणा-या जाणा-यांना त्याचे महत्व सांगतात.

विहारात धम्ममय वातावरण आहे.वंदनेच्या कार्यक्रमा नंतर विहाराच्या बाजुस बांधलेल्या प्रशस्त सभागृहा मध्ये  सुरूची भोज ची व्यवस्था केली होती.

या हाॅल च्या बाजुला कालवश भदंत ऊपाली महथेरो वाचनालय असुन या वाचनालयात विस हजार ग्रंथ आणि स्पर्धात्मक अभ्यास केंद्र असल्याची माहीती आद.

भदंत महथेरो ऊपगुप्त यांनी दिली.एवढे भव्य दिव्य,सर्व सोयीयुक्त विहार मराठवाड्यात पुर्णा येथेच असावे.भदंत ऊपगुप्त यांना वंदन.मी त्यांचा ऋणांकीत आहे. 


अशोकराव कांबळे साहेबानी सुरूची भोज दिले त्यांच्या प्रेमातच राहील.सांयकाळचे साडे पांच कधी वाजले कळलेच नाही.पुर्णेकरांनी खुप खुप प्रेम दिले त्यांना मानाचा जयभीम.