गोकुंदा व किनवट येथे अण्णाभाऊ साठे यांचा 52वा दिन साजरा
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 52 वा स्मृतिदिन किनवट शहरातील नियोजित
पुतळा बस स्टँड जवळ समस्त समाज बांधवांच्या वतीने व गूगल ऑनलाईन
ऍप्लिकेशन सेंटर गोकुंदा येथे अभिवादन करून साजरा करण्यात आला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 52वा स्मृतिदिन कार्यक्रमास आमदार भीमराव केराम
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले
यावेळी प्रामुख्याने रिपाईचे मराठवाडा उपाध्यक्ष दादाराव कयापाक,
माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार के मूर्ती व माजी उपाध्यक्ष नगरपरिषद चांद रतनजी,
खासदार हेमंत पाटील यांचे सुय सायक सुनील गरड,
शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, उपसंघटक सुरेश घुम्मडवार,
मारुती सूंकलवाड दिषा समिती सदस्य, उपप्रमुख कपिल किसले,
रिपाई तालुका अध्यक्ष विवेक ओमकार, हरि दर्शनवाढ,
बी एम पी सचिव विजय वाघमारे, सुभेदार मेजर तुकाराम मशीदवार,प्राध्यापक. भंडारे सर,
माजी जिल्हा परिषद सदस्य
प्रकाश गब्बा राठोड,
माजी सरपंच गोकुंदा प्रवीण मायकलवार, नगराध्यक्ष आनंद मच्छीवार ,
साजिद बडगुजर , मिलिंद सरपे , धनाजी बसवंते , ड एन बटुर , मधुकर आनेलवार,
शिवा क्यातमवार यासह अनेक मान्यवर समाज बांधव उपस्थित होते
यावेळेस कार्यक्रमाचे मारुती सूंकलवाड यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास प्राध्यापक.
पंजाब शेरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यशैलीवर बोलताना म्हणाले अण्णाभाऊ हे दीड दिवस
शाळा शिकून पस्तीस कादंबऱ्या लिहून समाजाला योग्य न्याय देण्याचे काम केले
यापैकी बऱ्याच कादंबरीवर चित्रपट प्रकाशित झाले असून फकीरा
ही कादंबरी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करून जग बदल घालुनी घाव सांगून गेले
मज भीमराव असा मोलाचा संदेश त्यांनी एका वाक्यात समाजाला ठणकावून सांगितले
गोकुंदा येथील गुगल ऑनलाइन एप्लीकेशन सेंटर येथे राज माहुरकर यांच्या समवेत कार्यक्रमास प्रमुख्याने उपस्थिती म्हणून श्रीहरी मुंडे, सुनील गीते सर,
संजय तलवारे, व्यवहारे सर, प्राध्यापक. शिंदे सर हे गोकुंदा येथील कार्यक्रमास उपस्थित होते
किनवट शहरात संपन्न झालेल्या कार्यक्रमास संरक्षण विभागाचे पोलीस निरीक्षक पी आय
सुखदेव थोरात व त्यांचे सहकारी श्री बोधमवाड सहकार्य केल्याने कार्यक्रम शांततेत पार पडला
सदर कार्यक्रम घडून आणण्यासाठी किनवट येथील पेंटर रमेश दिसलवार यांनी परिश्रम घेतले
तसेच 16 ऑगस्ट 1947 ला मुसळधार पावसामध्ये मोर्चा काढून ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी हे
असा नारा देणारे अण्णाभाऊ यांचे वाक्य आज मितीला सुद्धा समाजासमोर चिंतेचा विषय बनला आहे