Ticker

6/recent/ticker-posts

स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत वृक्षारोपण किनवट : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त किनवट


स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत वृक्षारोपण  

किनवट : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त किनवट 

शाखेच्यावतीने येथून जवळच असलेल्या कोठारी (चि ) 

येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. 
      

     किनवट शाखेचे मुख्य व्यवस्थापक अनुराग भस्मे, संतोष ताडपेल्लीवार

 मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी

संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, बँकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी, 

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच 

मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेचे 
सर्व शिक्षक वृंद यांचे हस्ते 250 वृक्ष 
लावण्यात आले. 

कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व पटल्याने ही वृक्षलागवड 

प्राणवायू देण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी मान्यवरांनी विशद केले.

फोटो कॅप्शन :

किनवट : स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत 

वृक्षारोपण करतांना  मुख्य व्यवस्थापक अनुराग भस्मे, संतोष ताडपेल्लीवार, 

अभि. प्रशांत ठमके आदी
 (छाया : निवेदक कानिंदे )