किनवट ता.प्र दि ३१ किनवट तालुक्याचा राजकिय व सामाजिक परिघ ज्या व्यक्ती शिवाय पुर्ण होऊ शकत नसे असे भारतीय राष्ट्रीय कॉग़्रेस चे ज्येष्ठ नेते प्रा.किशनराव किनवटकर यांचे आज दिनांक ३१ जुलै रोजी पहाटे हैद्राबाद येथिल सनशाईन रुग्णालयात उपचारा दरम्यान दुखःद निधन झाले.
मागील एक महिण्यापुर्वी प्रा.किशनराव किनवटकर हे आपल्या नातवंडांसोबत
साईबाबा मंदिरात संध्याकाळच्या वेळी दर्शना करिता गेले असता मंदिरातील फरशीवर पावसाचे पाणी सांडलेले होते
त्यामुळे ते खेळत असलेल्या नातीला घसरुन पडत असल्याचे पाहुन तीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाय घसरुन पडले
असता त्यांच्या कमरेचे हाड मोडले होते.
त्याकरिता त्यांच्यावर हैद्राबाद येथे उपचार करण्यात आले सुमारे एक महिना
उपचार सुरु होते ते उपचार घेतल्या नंतर रुग्णालयातुन त्यांना सुट्टी देण्यात आली,
घरी आल्या नंतर त्यांच्या वर झालेल्या शस्त्रक्रीये चे टाके काढण्यासाठी ते आदिलाबाद येथे रुग्णालयात गेले
असता तेथिल डॉक्टरला त्यांच्या पायाला आलेली सुज पाहुन काहीतरी गंभीर होत असल्याचे जाणवले
त्यामुळे आदिलाबाद येथिल डॉक्टरच्या सांगण्यावरुन त्यांना तत्काळ हैद्राबाद येथे पाचारण करण्यात आले.
तर डॉक्टरनी तपासणी केल्या नंतर त्यांच्या रक्त्तात रक्ताच्या गाठी होत
असल्याचे निष्पन्न झाले
व त्या नंतर त्यांना आय.सी.यु मध्ये हलवण्यात आले पुढील उपचारा दरम्यान ते कोमात गेले
व त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले.
दोन दिवसांच्या उपचारा नंतर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाने किनवट च्या पंचक्रोशीत शोककळा पसरली असुन
किनवट परिसरातील विविध समाज माध्यवावर त्यांना श्रध्दांजली देणा-या पोस्टचा महापुर आला आहे.
प्रा.किशनराव किनवटकर हे बळीराम पाटील महाविद्यालयातुन सेवा निवृत्त प्राध्यापक होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे
तर भाजपा नेते अनिल तिरमनवार व शिवसेनेचे मनोज तिरमनवार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवी तिरमनवार यांचे ते मोठे बंधु होते.
त्यांच्या दुखःद निधना बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी
दुरध्वनीवरुन व फेसबुक व्दारे दुख व्यक्त केले तर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, माजी खा. सुभाष वानखेडे,
आ. भिमराव केराम, माजी आ. प्रदीप नाईक, कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी ,
रा.कॉ चे प्रकाश राठोड, भाजपा चे ता. आध्यक्ष संदिप केंद्रे, शिवसेनेचे बालाजी मुरकुटे,
माजी नगराध्यक्ष कें. मुर्ती, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,
माजी जि.प सदस्य ज्योतिबा खराटे,
प्रविण म्याकलवार, अनिल क-हाळे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष वेंकट नेम्मानिवार,
शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार,
किनवट चे मानकरी मुकुंद नेम्मानिवार, कॉग्रेस चे गिरिष नेम्मानिवार, अशिष कहाले पाटील,
सुनिल गरड पाटील, राहुल नाईक, इसा खान साहब शेख़ आतिफ नसीर त गा ले साजिद बडगुजर मधुकर देश पांडे फशी भाई इमरान खान
जहिरोद्दीन खान, साजिद खान,
कचरु जोशी, दत्ता आडे