साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल किनवट
किनवट जि. नांदेड या आदिवासी भागातील वैद्यकीय उपचार सुविधांचा विचार करून भविष्याचा वेध घेणारा अशा या प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू आहे.
साधारणपणे 6 ते 7 कोटी खर्चाच्या या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन ते सव्वा दोन कोटी निधी उभा झाला
असुन जवळपास पावणे दोन कोटी
रूपयाचे बांधकाम झाले आहे.
साधारणपणे साडे 12 हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या बांधकामाच्या तळमजल्याचा स्लॅब नुकताच पुर्ण झाला
असुन पहिल्या मजल्याच्या पिल्लरची उभारणीही सुरू झाली आहे.
अनेक दानशूरांच्या मदतीतुन हा प्रकल्प उभा राहत असुन ज्यांनी आतापर्यंत प्रकल्प उभारणीसाठी मदत केली त्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करीत आहोत
आणि भविष्यातही सर्वांनी अगदी सर्वसामान्यांपासून अतिश्रीमंत
दानशूरांपर्यंत व कंपनी क्षेत्रातील सामाजिक
दायीत्व म्हणुन या प्रकल्पाला मदत करावी असे आवाहन भारत जोडो युवा अकादमी,
साने गुरूजी रूग्णालय परिवारातर्फे करण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे उपाध्यक्ष प्राचार्या सविता शेटे,
राम राठोड सचिव माधव बावगे, सहसचिव प्रा. डॉ. शारदा कदम,
कोषाध्यक्ष धर्मराज हल्लाळे कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर उईके,