नांदेड - जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.
याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी होती.
दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे अवाहन हे जिल्हाधिकारी डॉ. विपीन
इटनकर आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन -
मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी,
मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी
आम्ही घेत आहोत.
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
अफवांवर विश्वास ठेवू नये- अशोक चव्हाण
नांदेड जिल्ह्यात रविवारी सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
उपलब्ध माहितीनुसार,
या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात होता व रिश्टर स्केलवर त्याची ४.४ इतकी नोंद झाली आहे.
नागरिकांनी भयभीत होऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.
असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.