Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया किनवट च्या वतीने खा. हेमंत पाटील यांना किनवट शहरातील महामार्ग रुंदीकरण संदर्भात निवेदन


इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया किनवट च्या वतीने खा. हेमंत पाटील यांना किनवट शहरातील महामार्ग रुंदीकरण संदर्भात निवेदन 

किनवट /प्रतिनिधी:
किनवट शहरातून जात असलेल्या महामार्गाचे काम ठरलेल्या इस्टिमेट (अंदाज पत्रकाप्रमाणे) प्रमाणेच करण्यात यावे 

अशा आशयाचे निवेदन इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया किनवट च्या वतीने हिंगोली चे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

किनवट या आदिवासी तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून किनवट शहराच्या  सौंदर्यात भर टाकणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 

क्रमांक 161(ए) या मार्गाचे रुंदीकरण ठरलेल्या अंदाज पत्रकाप्रमाणे ( इस्टिमेट ) प्रमाणेच करण्यात येथील काही व्यापाऱ्यांनी खोडा घातल्याचे दिसून येत आहे.

 त्यामुळेच की काय शहरातून रुंदीकरण कमी करण्याच्या चर्चा ऐकू येत आहेत. 

रस्त्याचे रुंदीकरण कमी झाल्यास अरुंद रस्त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढणार आहे तसेच दुभाजक करण्यासाठीही अडचणी येणार आहेत. 
त्यामुळे सदरील रस्ता हा पूर्वनियोजित इस्टिमेट प्रमाणेच  करण्यात यावे 

अशी इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया यांच्यावतीने खासदार हेमंत पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.    

 अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
      
 तसेच किनवट शहरातील बीएसएनएल सेवा कोलमडली असून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातून अनेक ऑनलाइन ची कामे खोळंबली आहेत. 

याविषयी खासदार साहेबांनी लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.

 त्याचबरोबर किनवट तालुक्यात मटका, जुगार, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यावर अंकुश लावण्यासाठी उपाय योजना करण्याची ही विनंती करण्यात आली आहे.

याप्रसंगी आनंद भालेराव,नसीर तगाले,शेख परवीन मॅडम,शेख अतिफ,आशिष शेळके,प्रणय कोवे, सय्यद नदीम , परचाके,गंगाधर कदम,राज माहुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.