खासदाराच्या सूचनेवरून गोकुंद्यातील रस्ता व नालीकाम मार्गी लागल्याने मारोती सुंकलवाड यांनी केले आंदोलन स्थगित
किनवट : खासदार हेमंत पाटील यांच्या सूचनेवरून गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील बाळासाहेब ठाकरे चौक व्हाया
पेटकुले नगर ते हबीब कॉलनी रस्त्याचे काम त्वरीत हाती घेऊन नाली काम मंजूर केल्याचे पत्र देऊन त्वरीत काम हाती घेतल्याबद्दल
शिवसेना स्टाईल बांगड्यांचा आहेर आंदोलन स्थगित करीत असल्याचे शिवसैनिक तथा दिशा समिती अध्यक्ष मारोती सुंकलवाड यांनी जाहीर केले आहे.
पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे,
माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य गजानन कोल्हे पाटील, खासदारांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड,
आदर्श गाव कनकवाडीचे मा. सरपंच पंडीत व्यवहारे, साहेबराव गरड आदी कार्यकर्त्यांच्या उप स्थितीत सहायक गट
विकास अधिकारी राठोड यांनी रस्ता व नालीकाम हाती घेतल्याने आंदोलनापासून परावृत्त व्हावे असे पत्र मारोती सुंकलवाड यांना दिले.
किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या गोकुंदा ग्राम पंचायत हद्दीत बाळासाहेब ठाकरे चौक व्हाया पेटकुले नगर ते हबीब कॉलनी रस्ता नगर पालिका किनवट शिवेपर्यंत आहे.
हबीब कॉलनीतील सांडपाणी व पावसाचे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार असल्याने रस्त्यावरच येते. त्यामुळे येथे मोठ मोठे खड्डे पडले आहे.
तसेच एकविरा मंदीराजवळ गुडगाभर चिखल पाणी सदैव साचलेलं असतं.
रस्त्याच्या एका बाजूने तुडूब भरलेली नाली असते. दवाखाना,
शिकवणी व स्पर्धा परीक्षा वर्ग याच परिसरात असल्याने या रस्त्यावर नेहमीच प्रचंड वर्दळ असते.
परंतु या चिखलयुक्त खड्डा रस्त्यामुळे अनेक अपघात घडले ,
विद्यार्थ्यांसह सर्वच मुली महिलांना या रस्त्याने जातांना कसरत करावी लागते.
ही बाब हेरून कट्टर शिवसैनिक तथा दिशा समितीचे अध्यक्ष मारोती कानबाराव सुंकलवाड यांनी 29 जून 2021 रोजी
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. हा चिखलयुक्त रस्ता
दुरुस्त न झाल्यास दि. 15 जुलें रोजी गोकुंदा ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व किनवट पंचायत समितीचे गट विकास
अधिकारी यांना बांगड्यांचा आहेर देण्याचे शिवसेना स्टाईल अनोखे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
निवेदनाची एक प्रत प्राप्त झाल्याची दखल घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी गट
विकास अधिकारी सुभाष धनवे यांना तातडीने हे काम मार्गी लावण्याची सूचना दिली.
त्यावरून त्यांनी नाली बांधकाम मंजूर करून खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती तातडीने करावी असे आदेश दिले.
त्यावरून नव्यानेच रुजू झालेले ग्राम विकास अधिकारी प्रवीण रावळे यांनी पावसाची तमा न करता
चिखलमय पाणी साचणारा खड्डा सिमेंट काँकरेटने बुजवून रस्त्याचे काम हाती घेतले.
हबीब कॉलनी परिसरात सिमेंट पाईप टाकून रस्ता चांगला करणार असल्याचेही सांगितले.
ठाकरे चौक ते मंगाबोडी -दिगडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे.
म्हणून यापूर्वी ग्राम पंचायतीच्या कोण्याही ग्राम विकास अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही.