Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि १९ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असुन तो तत्काळ काढुन त्याजागी भव्य अश्वारुढ पुतळा बसवण्यात यावा व शहराच्या मध्यभागी सर्व सोई सुविधानी युक्त असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करुन त्यास संरक्षण भिंत बाधण्यात यावी


किनवट ता.प्र दि १९ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असुन तो तत्काळ काढुन त्याजागी भव्य अश्वारुढ पुतळा बसवण्यात यावा व शहराच्या मध्यभागी सर्व सोई सुविधानी युक्त असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करुन त्यास संरक्षण भिंत बाधण्यात यावी 

अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिग्रेड मार्फत आ.भिमराव केराम व मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना देण्यात आले.


किनवट शहराच्या मध्यभागी असलेला छ.शिवाजी महाराजांचा पुतळा हा जिर्ण झाला 

असुन तो केंव्हाही ढासळु शकतो त्यामुळे एखाद्या कार्यक्रमा वेळी अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते 

त्याकरिता तो जिर्ण पुतळा बदलण्यात यावा या करीता शहरातील विविध पक्ष, 

संघटनांनी वेळोवेळी आंदोलने व निवेदने दिली आहेत. 

परंतु प्रशासनाने त्याकरिता कोणत्याही स्वरुपाची पाऊले उचलली नाही. 

त्यामुळे शिव प्रेमी नागरीकांमध्ये प्रशासना विरुध्द प्रचंड रोष आहे. 

तर किनवट नगर परिषदेत भाजपा सत्तेत आली त्याच्या नंतर त्यांनी पुतळा सुशोभिकरणा करिता समितीची स्थापना केली

 परंतु त्या समितीने हि म्हणावी तशी पाऊले न उचलल्याने पुतळ्याचा प्रश्न अनेक दिवसापासुन प्रलंबित आहे 

यामुळे एखाद्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हि उपस्थित हि होऊ शकतो.


तर शहराच्या मध्यभागी असलेले सर्व सोईसुविधा व पार्किंगची व्यवस्था असलेले 

छ.शिवाजी महाराज मंगल कार्यालयामध्ये घाणीचे साम्राज्य, 

अतिक्रमणाचा विळखा, दुरुस्तीचा अभाव यामुळे निरुपयोगी ठरत आहे.
 त्यामुळे उपयोगी वास्तु निरुपयोगी ठरत 
आहे त्याचे संरक्षण करण्यात 
नगर परिषद कुचकामे ठरत आहे 

यामुळे छ.शिवाजी महाराज मंगल कार्यालय शिवाजी नगर परिसरात प्रचंड अतिक्रमण होत आहे

 त्यामुळे भविष्यात याचा त्रास शहरातील नागरीकांना होणार आहे.

 त्यामुळे त्या जागेचे संरक्षण करण्याकरिता संरक्षण भिंत बांधण्यात यावी व मंगल 

कार्यालयाचे सुशोभिकरण करण्याकरिता नगर परिषदेने तत्काळ पाऊले उचलावीत 

अन्यथा त्याविरुध्द तिव्र आंदोलन
 उभारण्यात येईल 

असे संभाजी ब्रिग्रेट ने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.


यावेळी आ.भिमराव केराम व मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनावेळी 

नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, 
माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, 

संभाजी ब्रिगेड चे बालाजी सिरसाट,
सचिन कदम, गोविंद आरसोड, 
आकाश इंगोले, शिवा पवार, 
शुभम हसबे, 

रितेश मंत्री, महेश चव्हाण, चंद्रकांत साळवे यांची उपस्थिती होती.