शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केलाय. पण यासह काही नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक ठेवले आहे.
५ जुलैला यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले होते.
त्यानंतर आज हा निर्णय जाहीर करण्यात आला.
करोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु व्हावी अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.
१५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे.
यानुसार कोविडमुक्त गावामध्ये आठवी ते १२वीचे वर्ग सुरु होणार आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.
करोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे काही ठिकाणी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न झाला.
आता आमचे संपूर्ण लक्ष हे येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आहे.
करोना काळात मुलांवर परिणाम होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत.
या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.