Ticker

6/recent/ticker-posts

' शब्दक्रांती ' प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे रविवारी होणार प्रकाशन !किनवट : स्मृतीशेष नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे नगरी, जेतवन बुद्धविहार सिद्धार्थ नगर किनवट येथे 'शब्दक्रांती'


' शब्दक्रांती ' प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे रविवारी होणार प्रकाशन !


किनवट : स्मृतीशेष नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे नगरी, जेतवन बुद्धविहार सिद्धार्थ नगर किनवट येथे 'शब्दक्रांती' 

 या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता .२५)  सकाळी ११ वाजता होणार आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिलाबाद (तेलंगना) चे प्रसिद्ध गझलकार मधू बावलकर हे राहणार आहेत.
        

    जवळपास चाळीस कवी - कवयित्रींच्या रचना असलेल्या या "शब्दक्रांती" प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन उत्तम कानिंदे आणि रमेश मुनेश्वर यांनी केले आहे.

 या सगहाला प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांची प्रस्तावना तर प्रसिद्ध समिक्षक प्रा. प्रकाश मोगले यांची पाठराखण आहे. 
        

    याच दिवशी स्मृतिशेष अनिल शिंदे विचार मंचावर कवितासंग्रहातील सहभागी कवी कवयित्रींचे कविसंमेलन होणार आहे.


ऍड.के.के. साबळे, सुजाता पोपलवार, प्रा.डॉ. गजानन सोनोने, वंदना तामगाडगे 

 प्रा.डॉ. किरण पाईकराव, नंदा नगारे, महेंद्र नरवाडे.  शांता राके,  प्रा.विनोद कांबळे,   प्रा. एस.डी. वाठोरे , प्रतीक्षा ठमके, प्रा.आनंद सरतापे,  

सीमा पाटील, रामजी कांबळे, राजा तामगाडगे, राजेश पाटील, चंचलकुमार मुनेश्वर, परमेश्वर सुर्वे,भारतध्वज सरपे, 

सोमा पाटील, प्रा.डॉ. राजू मोतेराव,सुरेश शेंडे,  शेषेराव पाटील, चंद्रकांत धोटे,रितिक जोगदंडे,  

प्रा.धनराज हलवले, प्रा.सुबोध सरपे, राजू कांबळे, रुपेश मुनेश्वर, सुमेध घुगरे, मारुती काळबांडे, अभि. मनीष गवई, 

 माणिक भवरे, सुरेश पाटील, अनिल उमरे, शीलरत्न पाटील हे संमेलनासाठी निमंत्रीत आहे.
          
  उत्तम कानिंदे सूत्रसंचालन व रमेश मुनेश्वर प्रास्ताविक करतील. 

 प्रा.डॉ. पंजाब शेरे आभार मानतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमास मास्क, 

सॅनिटायझरचा वापर करून आणि सुरक्षित 
अंतर ठेवून उपस्थित राहण्याचे 
आवाहन महेंद्र नरवाडे, रुपेश मुनेश्वर, 

प्राचार्य सुरेश पाटील, भारतध्वज सर्पे, राजेश पाटील, प्रा. सुबोध सर्पे यासह क्रांतीसूर्य परीवाराने केले आहे.