Ticker

6/recent/ticker-posts

मौजे गोकुंदा ग्रामपंचायत - पंचायतीचा नाकर्तेपणाचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे, शहरातील रस्ते, नाल्याची कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला असताना शहरातील नाल्याची, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे


मौजे गोकुंदा ग्रामपंचायत - पंचायतीचा नाकर्तेपणाचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे, 

शहरातील रस्ते, नाल्याची कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला असताना शहरातील नाल्याची, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 

शासनाकडून मौजे  गोकुंदा ग्रामपंचायत - विकासासाठी मिळालेला निधी अल्प प्रमाणात खर्च करून अनेक सत्ताधार्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले, 
त्यामुळे मौजे गोकुंदा शहरात करण्यात आलेले रस्ते, नाल्या उखडली आहेत. अश्या परीस्थीतीला पाहून ग्रामीण भागातील नागरिक शहरापेक्षा आमचे खेडे बरे आहेत, 

असे बोलून दाखवीत आहेत. स्वच्छतेची तर बोंबाबोंब झाली असून, यासाठी महिन्याला १५ लक्ष खर्च केले जात असताना ठेकेदार मात्र मुख्य रस्ते साफ करून 
गल्ली-बोळात सफाई करण्यात कुचराई करत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतः नाल्या साफ कराव्या लागत असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात जीवन जगावे लागते आहे. 

पावसाच्या पाण्यामुळे शहराची गटारगंगा झाली असून, डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

पाच वर्षापूर्वी मौजे गोकुंदा ग्रामपंचायत शहरातील जनतेने आपल्या प्रभागांमध्ये मोठ्या विश्वासाने आपला करता धरता म्हणून आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत 

वाड्रसेवक मेंबर म्हणून त्यांना निवडून देऊ सत्तेच्या चाब्या त्यांच्या हातात दिल्या पण शहरातील लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला 
सार्थक करतील असे काही काम तत्कालीन सत्ताधारी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सत्ताधाऱ्यांकडून झाल्याचे आपल्या मौजे गोकुंदा शहरात दिसून येत नाही आहे 

शहराचा विकास म्हणजे रस्ते नाली याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते काम यांच्या हातून घडलेली नाहीत पण रस्ते 

नाली साठी कोटीच्या कोटी रूपये शासनाकडून आल्यानंतर त्यामध्ये विकासाच्या नावाखाली आपले घर कसे भरता येईल याचे काम 

तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेले आहे त्याचे हे उघड डोळ्याने पाहावे असे फोटो सुद्धा सोशल मीडियावर येत आहे 
आता तरी शहरातील लोकांनी या गोष्टीचा विचार करून शहराचा विकास करून स्वतःचा विकास करणाऱ्या लोकांना सोडून सर्वसामान्य लोकांसाठी कार्य करणारे व

 नगरपंचायत मध्ये जाऊन तुमचे विषय मांडणारे लोकं पाठवावीत तरच शहराचा विकास होईल नाहीतर अशा दणदणीत डबल आपल्या सर्वांना जगावे लागेल याची जाणीव त्यांनी केली पाहिजे.
gokunda ग्रामपंचायत
पाच वर्षापूर्वी मौजे गोकुंदा ग्रामपंचायत शहरातील जनतेने आपल्या प्रभागांमध्ये मोठ्या विश्वासाने आपला करता धरता म्हणून आपल्या 

प्रभागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत वाड्रसेवक मेंबर म्हणून त्यांना निवडून देऊ सत्तेच्या चाब्या त्यांच्या हातात दिल्या पण शहरातील लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला 
सार्थक करतील असे काही काम तत्कालीन सत्ताधारी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सत्ताधाऱ्यांकडून झाल्याचे आपल्या मौजे गोकुंदा शहरात दिसून येत नाही आहे

 शहराचा विकास म्हणजे रस्ते नाली याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते काम यांच्या हातून घडलेली नाहीत पण रस्ते नाली साठी कोटीच्या 

कोटी रूपये शासनाकडून आल्यानंतर त्यामध्ये विकासाच्या नावाखाली आपले घर कसे भरता येईल याचे काम तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलेले आहे 

त्याचे हे उघड डोळ्याने पाहावे असे फोटो सुद्धा सोशल मीडियावर येत आहे आता तरी शहरातील लोकांनी या गोष्टीचा विचार करून शहराचा 

विकास करून स्वतःचा विकास करणाऱ्या लोकांना सोडून सर्वसामान्य लोकांसाठी कार्य करणारे व नगरपंचायत मध्ये जाऊन तुमचे विषय मांडणारे लोकं पाठवावीत तरच शहराचा विकास होईल 

नाहीतर अशा दणदणीत डबल आपल्या सर्वांना जगावे लागेल याची जाणीव त्यांनी केली पाहिजे.