किनवट गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची कोणत्याही प्रकारची पूर्वतपासणी न करता केवळ महिला कर्मचाऱ्याच्या भरोशावर महिला,वयोवृद्ध नागरिकांना कोविड डोस देण्याचा गंभीर प्रकार आज पहावयास मिळाला
असून रुग्णालय प्रशासनाच्या या लापर्वाहिमुळे ईच्छा असून देखील नागरिक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
काळजीपूर्व उपचारा
संदर्भात नेहमीच वादग्रस्त ठरण्याऱ्या गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा
बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघडकीस आला असून या रुग्णालयात कोविड 19 ची लस घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक,
महिला तसेच वयोवृद्धाना त्यांची पूर्व तपासणी न करता तज्ञ डॉक्टरांच्या अनुपस्थिती केवळ एकच महिला कर्मचारी कोविसिल्ड व कोव्याक्सीन लस देत
असल्याचा गंभीर प्रकार आज दिसून आला.
विशेष म्हणजे नादुरुस्त असलेल्या यंत्राद्वारे
वयोवृद्ध रुग्णाची रक्तदाब तपासणी होत असल्याचा आरोप लस घेण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी केला
असून या रुग्णालयातील डॉक्टरांची नेहमीची अनुपस्थिती व बेजबाबदारीच्या उपचार पद्धतीमुळे संताप व्यक्त होत आहे
डॉक्टर तसेच रुग्णालय प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी होत असतात परंतु
डॉक्टर असोसिएशन संघटितपणे वरिष्ठप्रशासन व तक्रारकर्त्यावर दबावतंत्राचा वापर करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असतात.
कोरोनाच्या आपत्तीजनक काळात
डॉक्टरांनी चोखपणे कर्तव्य बजावण्याचे शासनाचे निर्देश
असले तरी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील
डॉक्टर कर्तव्याला दांडी मारत परिचारिका अथवा महिला कर्मचाऱ्यांवर उपचाराचे काम सोपवून नामानिराळे राहत असल्याचे निदर्शनास येते
कोणताही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसताना केवळ एकच महिला कर्मचारी तरुण, वयोवृद्ध महिला व पुरुषांना कोविडचे दोन्ही डोस देत
असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत असून अनेक जण इच्छा असून देखील या रुग्णालयातील
भोंगळ कारभारामुळे भीतीपोटी कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.