Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा व परिसरात “झाड” म्हटल की, मुरलीधर बेलखोडे हे नांव पुढे येते अशी ओळख. वर्धा शहर ते गांधीजींचा सेवाग्राम आश्रम हा हमरस्ता व या हमरस्या् वर असलेले गांधीजींचे सहकारी महादेवभाई देसाई


मुरलीधर वामनराव बेलखोडे

निसर्ग सेवा समिती वर्धा चे संस्थापक. लाखाच्या वर वृक्षलागवड करून त्यांची जतन व संवर्धन करण्याचे अवघड काम जीवनकार्य म्हणुन स्विकारलेले हे व्यक्तीमत्व. 

वर्धा व परिसरात “झाड” म्हटल की, मुरलीधर बेलखोडे हे नांव पुढे येते अशी ओळख. 

वर्धा शहर ते गांधीजींचा सेवाग्राम आश्रम हा हमरस्ता व या हमरस्या् वर असलेले गांधीजींचे सहकारी महादेवभाई देसाई आणि 

पुज्य कस्तुरबा गांधी यांच्या नावाने असलेले हुतात्मा स्मारक इत्यादी ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने झालेले 

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हीच त्यांची ओळख. अगदी रामदेवबाबा पासुन प्रकाश आमटे, मेधाताई,

 राजीव दिक्षीत इत्यादींच्या पदस्पर्शाने व वृक्षलागवडीने समृध्द झालेले हा हुतात्मा स्मारक परिसर म्हणजे मुरलीधर बेलखोडे यांचे कार्य.

वर्धेच्या उत्तरेस एका टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करून तेथे तयार केलेला ऑक्सीजन पार्क 

व विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती मिळावी म्हणुन उभे राहिलेले वृक्षग्रंथालय हीही त्यांचीच ओळख. 

अरण्यऋषी मारोती चित्तमपल्ली यांच्या वास्तव्याने व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 

या ऑक्सीजन पार्कचा उदय व प्रवास 
झाला हीही त्यांचीच ओळख. 

आज मुरलीधर बेलखोडे यांचा वाढदिवस त्यांचा मुक्काम आज किनवट येथे झाला. 

साने गुरूजी रूग्णालय परिवाराने किनवट 

परिसराची आरोग्य विषयक गरज 
ओळखुन हाती घेतलेला 
महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे “साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल” 

किनवट. या प्रकल्पाच्या बांधकामाचा एक टप्पा पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

वृक्षारोपण व संवर्धनात आयुष्यभर काम केलेल्या मुरलीधररावांच्या नियोजनातुन 
 व प्रयत्नातुन हे वृक्षारोपण करण्यात आले.

 या प्रसंगी या विभागाचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम,  

सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, 

तहसिलदार उत्तम कागणे, माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान, के.मुर्ती,

 वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, विनायक खैरनार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, 

अयज नेम्मानीवार, नगरसेवक अजय चाडावार
 व मुख्याद्यापक कैसर शेख इत्यादींच्या 
हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

हा एक अनोखा योगायोग होता. 
भारत जोडो युवा अकादमी,
 साने गुरूजी रूग्णालय परिवारातील सदस्यांनी व किनवट नगरीतील नागरीकांनी असा हा अभूतपूर्व व आनंददायी सोहळा अनुभला. 

कौटुंबिक पातळीवरती 90 वर्षे वयाच्या आई (शांताबाई बेलखोडे) व 78 वर्षे वयाच्या काकांच्या (भैय्याजी बेलखोडे)

  उपस्थितीत व परिवारासोबत त्यांचा हा किनवट येथील पहिलाच वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला.