शिवसेना ता प्रमुख बालाजी मुरकुटे (पाटील) यांच्या नेतृत्वात किनवट मध्ये शिव संपर्क अभियान संपन्न
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक
12/07/2021ते24/07/2021 पर्यंत शिव संपर्क अभियान अंतर्गत गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा उदात्त हेतू ठेवून
कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या त्याचाच एक भाग किनवट तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांनी अति उत्साहाने शिवसेना तालुकाप्रमुख यांच्या
नेतृत्वात दिनांक 22/07/2021 रोजी तालुक्यातील 4 सर्कलमध्ये व 8 गणांमध्ये गाव पातळीवर सदरचे अभियान राबविण्यात आले.
किनवट तालुक्यामध्ये पिंपळ शेंडा ते मलाकजाम तेलंगणा बॉर्डर पर्यंत 150 किलोमीटर अंतर असून तालुक्यामध्ये
अतिशय डोंगराळ भाग वाड्या तांडे आदिवासी पाडे यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असून 193 गावे 6 सर्कल 12
पंचायत समिती गण 134 ग्रामपंचायती अस्तित्वात असून नांदेड जिल्ह्या पासून 150 किलोमीटर अंतरावर किनवट तालुका
आदिवासी तालुका म्हणून ओळख आहे अशा या तालुक्यांमध्ये मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेनुसार शिव
संपर्क अभियान अंतर्गत गाव तिथे शाखा घर पिते शिवसैनिक या संकल्पनेला शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या नेतृत्वात अभियानाला
दिनांक 22/07/2021 रोजी सकाळी 8 वाजता इस्लापूर पासून सुरुवात करण्यात आली इस्लापूर सर्कल मधील सर्व शाखेला भेटी देत शिवनी
जलधारा धानोरा बोधडी चिखली फाटा मार्गे गोकुंदा सर्कल येथील सर्व शाखा प्रमुख यांचे भेट देऊन सायंकाळी 7 वाजता गोकुंदा
येथील शासकीय विश्रामगृह समोरील गोकुंदा शाखा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले
यानंतर विश्राम ग्रहांमध्ये सर्व शाखेच्या प्रमुखांसह व उपस्थित शिवसैनिक यांच्यासमवेत बैठक घेऊन दिवसभर
शिवसैनिकांच्या झालेल्या भेटी मध्ये सर्व मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले सदर संपर्क
अभियानामध्ये शिवसेनेचे हिंगोली नांदेड बीड संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव, नांदेड जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,
नांदेड जिल्हा समन्वयक धोंडू दादा पाटील, जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा दादा खराटे हे उपस्थित होते यावेळेस तालुक्यातील शिवसैनिक दिशा
समिती सदस्य शिवसैनिक मारूती सूंकलवाड, माजी उपसभापती पंचायत समिती गजानन कोल्हे,
सुनील पाटील, सुनील गरड, प्रशांत कोरडे ,मारुती दिवसे, बजरंग वाडगुरे, सुरेश घूमडवार,
कपिल किसले, अतुल दर्शनवाढ, प्रमोद केंद्रे, प्रमोद जाधव, सुनील गुरनुले,
अजीज शेख, संतोष यालचलवार, सुरज सातूरवार, नागेश राव, राजू वडेट्टीवार,
यासह असंख्य शिवसैनिक अभियाना मध्ये सामील होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगळीवेगळी ओळख असून
त्याचप्रमाणे किनवट तालुक्यामध्ये सुद्धा आगळी वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकमेकाशी आदराने कार्य करावे असे मार्गदर्शन करताना सांगितले
यानंतर तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांना तालुक्यातील घडामोडी व गाव शाखे बाबत वरिष्ठांनी विचारणा केली
असता तालुकाप्रमुख यांनी मी जेव्हा 2017 पासून तालुकाप्रमुख झालो
्यावेळेस तालुक्यांमध्ये फक्त 38 शाखा नोंद होत्या यावर आज रोजी 393 शाखा गावपातळीवर व वॉर्ड पर्यंत
शाखा नोंद केल्याचे सांगितले तसेच हजारो शिवसैनिक सदस्य नोंदणी सुद्धा केलेली आहे
यापुढे मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतील घर तिथे शिवसैनिक तयार करण्याचे स्वतः संकल्प केला यावेळी उपस्थितांनी तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील
यांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले व सदर छोटेखानी मिटींगचे सूत्रसंचालन व आभार मारोती सुकलवाडी यांनी केले