आमदार भीमराव केराम कडून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी समर्थन
किनवट शहर प्रतिनिधी, (राज माहुरकर)
मराठा समाजाचे ओबिसीकरण,ओबिसींचे संरक्षण,२१८५ मराठा तरूणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात या मागण्यांसाठी आमदारांनी
समाजासोबत असल्याचे सोंगे बंद करुन आम्हाला ५ व ६ जुलैच्या अधिवेशनात भुमिका मांडेल
असे लेखी पञ दिल्याशिवाय घरासमोरुन उठणार नाही अशी ठाम भुमिका मांडत
किनवट माहुरचे आमदार भिमराव केराम यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडच्यावतीने ठिय्या मांडला.
मराठा समाजाचा ओबिसीत समावेश झाला पाहीजे,ओबिसी आरक्षणाचे
संरक्षण ,२१८५ मराठा तरुणांच्यि रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात,
सर्व समाजाची जातिनिहाय जनगणना झाली पाहीजे
हे विषय विधानभवनात मांडावेत यासाठी संभाजी ब्रिगेड नांदेड ने
आ.भिमराव केराम यांच्या घरासमोर ठिय्या मांडला व जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी
लिहुन देणार तो पर्यंत आम्ही इथुन उठणार नाही असे म्हंटले
त्यावर आमदारांनी संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांना
मी आमदार भिमराव केराम
भारताचे संविधान ,उद्देशिका तसेच शिवराय , फुले, शाहू, आंबेडकर
यांच्या विचारांचे स्मरण करून शपथपुर्वक कथन करतो की,मी मराठा समाजाचे ओबीसीकरण,
ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, २१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करणे बाबत व
सर्व समाजघटकांची जातिनिहाय जनगणना करणे बाबत,
या व मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक ०५ व ०६ जुलै २०२१ रोजी होणाऱ्या
विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडेल . तसेच मराठा ओबीसीकरणासाठी विशेष अधिवेशन भरवून महामहिम
राज्यपाल यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी
अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय यांना करेल व न्याय मिळवून देईल अशी हमी देतो असे लेखी लिहुन दिले.
यावेळी संभाजी ब्रिगेड माहुर तालुकाध्यक्ष विशाल पाटील शिंदे,
संभाजी ब्रिगेड किनवट तालुकाध्यक्ष सचिन कदम पाटील,छञपती क्रांती सेनेचे जि.
अध्यक्ष संतोष अडकीणे,शिवा पवार, गोविंद अरसोड, सुमीत माने, अमोल पवार,
लश्मीकांत पवार, विक्रम पवार, समाधान उटकर, सोनु चौधरी, वैभव जाधव, सोहम राऊत,