Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेचे नांदेड, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष घोषित तर किनवट येथील सय्यद नदीम यांची नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड




दंगामुक्त भारत, नशामुक्त भारत, भूकबळीमुक्त भारत या अभियाना अंतर्गत सुशिक्षित, सशक्त, कर्तव्यदक्ष आणि मानवी 

मूल्यं जपणारी तरुण पिढी निर्माण करणे, तसेच देश सेवा आणि मानव सेवेसाठी सदैव 

तत्पर असणारी युवा पिढी तयार करणे हे लक्ष्य समोर ठेवून टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रात वाटचाल करीत आहे. 

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, 

बहुजनांचा बुलंद आवाज आदरणीय शेख सुभान अली सर यांच्या मार्गदर्शनात टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रातच 
नव्हे तर देशात उत्कृष्ट कार्य करते आहे. 

याचाच एक भाग म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष  डॉ. ज़हीरूद्दिन पठान 

यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वात नांदेड जिल्हा कार्यकारिणीची एक बैठक घेण्यात आली. 

सर्वानुमते दोन जिल्हाध्यक्ष निवडण्यात आले. 


नांदेड जिल्हाध्यक्ष (दक्षिण) पदी सय्यद नदीम भाई किनवटकर यांची आणि नांदेड जिल्हाध्यक्ष
 (उत्तर) पदी इनामदार ज़करीया यांची निवड करण्यात आली.

 सोबतच नांदेड महानगराध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते सय्यद ज़मीर हुसेन 

आणि महानगराध्यक्ष उपाध्यक्ष पदावर अभियंता अब्दुल तौफिक यांची निवड करण्यात आली. 

लवकरच जिल्हा कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल. 

यावेळी औरंगाबाद येथील टिपू सुलतान ब्रिगेडचे कार्यकर्ता अब्दुल मुबीन यांची टिपू सुलतान ब्रिगेडच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले तसेच पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या