*जागतिक न्याय दिनानिमित्त वकीलांचा गोदावरी अर्बन शाखा, किनवटच्या वतीने सत्कार*
किनवट,ता.१७(बातमीदार): न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून
देणाऱ्या वकिलांचा गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑप च्या वतीने आज(ता.१७) जागतिक
न्यायदिनाचे औचित्य साधून न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
न्यायव्यवस्थेमुळेच देशात आणि जगात आज शांतता आणि समता अबाधित आहे.त्यामुळे न्यायव्यवस्था ही सर्व सामान्यासाठीच आहे
ही भावना यानिमित्ताने दृढ व्हावी याअनुषंगाने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांच्या
संकल्पनेतून आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनखाली
वकील संघाचे ॲड.अरविंद चव्हाण-(अध्यक्ष), ॲड.तौफिक कुरेशी-(उपाध्यक्ष),ॲड.राहुल सोनकांबळे,
ॲड.सुनील सिरपुरे,ॲड.उदय चव्हाण, ॲड.मिलिंद सर्पे,ॲड.श्रीकृष्णा राठोड, ॲड.मुसळे,
ॲड.किशोर मुनेश्वर, ॲड.नयन मुनेश्वर,ॲड. दिलीप काळे
आदी.वकीलांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला
जगभरात १७ जुलै हा जागतिक न्याय दिवस साजरा केला जातो.१९९८ च्या रोम ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायची संकल्पना मांडण्यात आली.
पृथ्वीतलावरील कोणत्याही भागात मानवावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध संवेदनशील व्हावे, यासाठी
कायद्याचे राज्य आणि जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर
कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून जागतिक न्यायालय स्थापन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि सेवांची माहिती देण्यात आली.
वकील हे संविधानिक तत्वाचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत
असतात.त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या मागचा उद्देश आहे.या कार्यक्रमाला,
गोदावरी अर्बन शाखा किनवट- प्रभारी शाखा व्यवस्थापक प्रकाश बेक्कमवार,