Ticker

6/recent/ticker-posts

किनवट चे तहसीलदार उत्‍तम कागने यांची सारखनी येथील गुटखा तस्‍करावर कार्यवाही.आरोपीच्‍या शोधात सिंदखेड पोलीस.


(किनवट चे तहसीलदार उत्‍तम कागने यांची सारखनी येथील गुटखा तस्‍करावर कार्यवाही.आरोपीच्‍या शोधात सिंदखेड पोलीस.  

सारखनी प्रतीनीधी / रशीद फाजलानी 
 
नांदेड जिल्‍याच्‍या किनवट तालुक्‍यातील सारखनी येथील जंगलात दि.११ जुलै रोजी राञी किनवट कडुन 

सारखनी कडे दुचाकी वरुन अवैध गुटखा जात असल्‍याच्‍या गोपनीय माहती वरुन

किनवटचे तहसीदलार उत्‍तम कांगणे यांनी सापळा रचुन तिन 

आरोपी सह अवैध गुटखा व दुचाकी जप्‍त करुन सिंदखेड पोलीसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले होते, 

त्‍या वरुन आज दि.२० जुलै २०२१ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्‍यात अन्‍न व औषध प्रशासनाचे अधीकारी सतीश हाके 

यांच्‍या फिर्यादी वरुन गुन्‍हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिपक भोपळे हे करित आहे....
  

   किनव ट चे तहसीलदार उत्‍तम कागणे यांनी तालुक्‍यात अवैध रेती तस्‍करी वर आळा घालण्‍या साठी राञी बे राञी आपल्‍या पथका सह फिरुन 

अनेक वाहनावर कार्यवाही करत आपली वेगळी छाप जनतेत निर्माण केली आहे. 

अवैध रेती सह त्‍यांना महाराष्‍ट्र शसनाने प्रतिबंधीत केलेला व शरीरास अपायकारक असलेला अवैध गुटखा पकडण्‍यात यश मिळाला आहे,

या बाबत सविस्‍तर  वृत्‍त असे कि 
दि.११ जुलै २०२१ रोजी राञी १० 

वाजताच्या सुमारास किनवट कडुन सारखनी कडे दुचाकी वरुन अवैध गुटखा तस्‍करी होत 

असल्‍याची गोपनीय माहीती मिळाली या वरुन सारखनी घटात सापळा रचुन 

किनवट कडुन सारखनी कडे दुचाकी 
वर जात असलेला अवैध गुटखा
 जप्‍त करुन तिन आरोपी सह  

MH26 BT 7951 क्रमांकाची दुचाकी जप्‍त करुन सिंदखेड पोलीसाच्‍या ताब्‍यात दिली.


त्‍या वरुन आज दि.२० जुलै २०२१ रोजी नांदेड येथुन अन्‍न व 

औषध प्रशासनाचे अधीकारी सतीश सुभाषराव हाके 

यांच्‍या फिर्यादी वरुन सिंदखेड पोलीस ठाण्‍यात आरोपी गुटखा तस्‍कर 

१) सतीष शुध्‍योदन भवरेवय २० वर्षे, 

२) नागेश शेषेराव तोडसाम वय २० वर्षे 

३) अजीम आरीफ फाजलानी ऊर्फ बाबु व गुन्‍ह्यात वापरलेली  MH26 BT 7951  

क्रमांकाची दुचाकीचे कायदेशीर मालक सर्व रा.सारखनी असे 

चार आरोपींच्‍या विरोधात सिंदखेड
 पोलीस ठाण्‍यात 

गु.र.न.११४/२०२१ कलम अन्‍न सुरक्षा व 

मानके कायदा २००६,नियम व नियमन चे कलम २६ (२) व २६ (२) 

सह वाचक कलम २७ (३) (ई) कलम ३० (२) 
(अ), ५९ व सहकलम १८८,२७२,२७३,३२८
 व ३४ भादवी 

नुसार गुन्‍हा दाखल केला 
असुन आरोपींन कडुन 

१) राज निवास पान मसाला 

२) एन.पी.०१ सुगंधीत तंबाखु 

३) आर.के.प्रमियम गुटखा 

४) विमल पान मसाला व

 ५) दुचाकी असे एकुण ८६,६७० रुपयाचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला असुन 

सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक
 पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके
 यांच्‍या मार्गदर्शना खाली 

पोलीस उप निरीक्षक दिपक भोपळे 
हे पुढील तपास करित आहे 

व सर्व आरोपींचा शोध सिंदखेड 
पोलीस घेत आहेत.
 
    गुटखा तस्‍करांना पोलीस व अन्‍न
 व औषध प्रशासनाच्‍या अधीकार्यांची
 भीती होती

 माञ तहसीलदार उत्‍तम कागणे यांनी गुटखा तस्‍करांवर केलेल्‍या कार्यवाही मुळे अवैध गुटखा तस्‍करांचे चांगलेच धाबेद नानले आहे, 

त्यांच्‍या या धडक कार्यवाही चे जिल्‍हाधीकारी डॅा.विपीन ईटनकर, 

व सहाय्यक जिल्‍हाधीकारी किर्ती कीरन एच. पुजार यांनी प्रशंषा केली आहे