Ticker

6/recent/ticker-posts

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार हेमंत पाटील यांनी केला वारंगा ते मांडवी दौरा ; लवकरच मिळणार नेटवर्क आणि ब्रॉडबँडची दर्जेदार सुविधा


बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार हेमंत पाटील यांनी  केला 
वारंगा ते मांडवी दौरा ;  लवकरच मिळणार नेटवर्क आणि ब्रॉडबँडची दर्जेदार सुविधा
-------

नांदेड /हिंगोली  : हिंगोली  लोकसभा मतदारसंघातील वारंगा ते मांडवी दरम्यान नेटवर्कच्या आणि दूरध्वनी सेवेच्या येणाऱ्या अनेक अडीअडचणी बाबत खासदार हेमंत पाटील यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व 

हदगाव,माहूर,किनवट यासह इतर एक्सचेंज कार्यालयातील असुविधांची पूर्तता करण्यात यावी याबाबत संबंधितांना निर्देश दिले . 


सध्या पीकविमा भरण्यासाठी आणि बँकेचे  व्यवहार सुरळीत होण्यासाठी इंटरनेट नेटवर्कचा मोठा अडथळा जाणवत असून या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणीची जाणीव करून दिली. 

या दौऱ्यामुळे मोठा सकरात्मक बदल होणार असून,नागरिकांना लवकरच दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. 
    

      खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पीकविमा आणि पीककर्जाचे  आवेदन पत्र भरण्यासाठी शेतकऱ्यांची बँक आणि अर्ज भरणा केंद्रावर गर्दी होत आहे.  

परंतू मागील बऱ्याच दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बीएसएनएल ची नेटवर्क सेवा कोलमडली असून यामुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे . 
त्यामुळे अनेक जण पिक कर्ज आणि पिकविमा सुविधेपासून वंचित आहेत.  गतवर्षी  हि संख्या हजारोच्या आसपास होती 

किनवट येथील मका ज्वारी खरेदी केंद्रावर  सुद्धा हीच परिस्थिती असल्याने राज्यशासनाला दुबार ऑनलाईन अर्ज मागवावे लागले होते 

यामुळे शेतकऱ्याना आर्थिक भुर्दड सहन करावा लागला होता . याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आणि माहुर, मांडवी येथील पदाधिकार्यांकच्या मागणीवरून 

  तातडीने यावर उपाययोजना करण्यासाठी बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी मतदारसंघातील  

सर्वच एक्सचेंज कार्यालयात भेटी दिल्या या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड जिल्हा बीएसएनएल चे महाप्रबंधक आणि इतर तांत्रिक अधिकाऱ्यांना सोबत घेतले होते 

आणि हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वारंगा ते मांडवी दरम्यान 
बीएसएनएल च्या   कार्यालयाची   प्रत्यक्ष पाहणी केली व समस्यां जाणून घेतल्या . सर्वच  ठिकाणच्या नेटवर्क  आणि ब्रॉडबँड , साफसफाई, स्पीड, रूट OFS एक्सचेंज नेटवर्क, विभागाची पाहणी केली.


 दरम्यान त्यांनी वारंगा , मनाठा , बरड शेवाळा , पळसा निवघा , तळणी, कोहळी , उमरखेड, धनोडा , महू, आष्टा , वाई , दहेली तांडा , सारखणी , मांडवी , वानोळा, कुपटी, 

किनवट , बोधडी , जलधारा , पाटोदा , इस्लापूर, अप्पाराव पेठ , शिवणी ,बोधडी तांडा, उमरी बाजार, हिमायतनगर, जवळगाव , सरसम , दरेसरसम 

वाळक्याची वाडी या ठिकाणी भेटी देऊन याठिकाणी असलेल्या आणि नसलेल्या  यंत्रणेची माहिती घेतली 

व तात्काळ या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिले . 

कमी असलेल्या बाबींची  पूर्तता तात्काळ करून मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला नेटवर्क आणि ब्राँडबँड च्या दर्जेदार  सुविधा देण्यात याव्यात असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

  यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जोतिबा खराटे, 

हदगाव तालुका प्रमुख  शामराव चव्हाण, भाजप  प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.संध्याताई राठोड, प्रफुल्ल राठोड , 

बीएसएनएलचे महाप्रबंधक पवनकुमार बारापत्रे   विभागीय अभियंता धर्माधिकारी, भ्रमणध्वनी कनिष्ठ अभियंता श्रीगोपाल झंवर 

ऑप्टिकल फायबर चे कनिष्ठ अभियंता  विजय तुपकर , हदगाव येथील कनिष्ठ अभियंता अंकित महाद्वाड , 

किनवट -माहूर चे कनिष्ठ अभियंता एम. रवीकुमार  यांच्यासह इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी सोबत होते. 

या पाहणी दौऱ्यामुळे बीएसएनएलच्या सर्वच विभागाला खडबडून जाग आली

 असून तातडीने सर्व उपाय योजना केल्यानंतर लवकरच काही दिवसात मतदार संघातील जनतेला दर्जेदार नेटवर्क आणि ब्रॉडबँड ची सुविधा मिळणार आहे.