Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांची विशेष काळजी घ्या -खासदार हेमंत पाटील


दिव्यांगांची विशेष काळजी घ्या -खासदार हेमंत पाटील
---------------------------------------------------------------------------------
माहूर : मतदारसंघातील हिंगोली ,नांदेड , आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेऊन त्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे वागणूक द्यावी असे 

भावोद्गार खासदार हेमंत पाटील यांनी दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी काढले . सामाजिक अधिकारिता शिबिर  ADIP  आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत 

दिव्यांग व वरिष्ठ नागरीकांना माहूर येथील  जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात उपयुक्त निशुल्क साहित्याचे वाटप खासदार .हेमंत पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले.
       

    खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून आणि पंचायत समिती माहूर कार्यालयाकडून गतवर्षी  डिसें.२०२० मध्ये मतदारसंघातील १५ हजार दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती . 

त्यानंतर १० हजार दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्यात  आवश्यक  साहित्याच्या वाटपाला सुरवात करण्यात आली 

असून खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरवात माहूर येथून करण्यात आली . 
यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, हिंगोली लोकसभा मतदार संघाने हा सर्वप्रथम उपक्रम सुरू केला  आहे . 

हिंगोली सोबतच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना याचा लाभ होणार आहे . 

सध्या स्थितीत याठिकाणी ४३४  लाभार्थी असले तरी १० हजार दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे .

केंद्र  शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु 

यंत्रणेच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहचत नाही हि खेदाची बाब आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन  

समाजातील इतर घटकांनी दिव्यांगांची विशेष काळजी घ्यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .  

माहूर  तालुक्यातील ४३४  लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती . 

माञ दरम्यानच्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे हे वाटप थांबविण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आज (दि ६ जुलै)  रोजी साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली  

खासदार हेमंत पाटिल यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा यथोचित सत्कार करून उपयुक्त साहित्याचे वाटप दिव्यांग बांधवाना करण्यात आले.

यावेळी माहूर न.प.नगराध्यक्ष  शितल 

जाधव,प.स.सभापती अनिता कदम, शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे,

शिवसेना तालकाप्रमुख  सुदर्शन नाईक, बिएसएनएल चे जनरल मॅनेजर पवनकुमार बारापत्रे, 

गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान यश खराटे,

संदेश केराम, खा.हेमंत पाटील यांचे जन संपर्क अधिकारी सुनील गरड,कक्ष अधिकारी बी.सी. चव्हाण,

विस्तार अधिकारी तेलतुंबडे आदी
 उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार एस.एस.पाटिल यांनी मानले .

यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती  होती.