Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान युवा ब्रिगेड मराठवाडा अध्यक्षपदी शेख कलीम आणि उपाध्यक्षपदी फयाज पठाण यांची निवड. / किनवट /सय्यद नदीम/ *दंगामुक्त भारत, नशामुक्त भारत, भूकबळीमुक्त भारत या अभियाना अंतर्गत सुशिक्षित, सशक्त,


टिपू सुलतान युवा ब्रिगेड मराठवाडा अध्यक्षपदी शेख कलीम आणि उपाध्यक्षपदी फयाज पठाण यांची निवड. 


/ किनवट /सय्यद नदीम/                   
*दंगामुक्त भारत, नशामुक्त भारत, भूकबळीमुक्त भारत या अभियाना अंतर्गत सुशिक्षित, सशक्त, 

कर्तव्यदक्ष आणि मानवी मूल्यं जपणारी तरुण पिढी निर्माण करणे, तसेच देश सेवा आणि मानव सेवेसाठी सदैव तत्पर असणारी 

युवा पिढी तयार करणे हे लक्ष्य समोर
 ठेवून टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रात 
वाटचाल करीत आहे. 

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचा बुलंद आवाज आदरणीय शेख सुभान अली सर 

यांच्या मार्गदर्शनात टिपू सुलतान ब्रिगेड महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करते आहे. 
        
 बहुजन समाजाच्या आणि विशेषत: मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणारी टिपू सुलतान ब्रिगेडचे ही संघटना आहे. 

प्रदेश अध्यक्ष  डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे एक बैठक घेण्यात आली. 
या बैठकीत टिपू सुलतान युवा ब्रिगेडच्या मराठवाडा अध्यक्षपदी जुने आणि समर्पित कार्यकर्ते शेख कलीम यांची आणि 

टिपू सुलतान युवा ब्रिगेडच्या उपाध्यक्षपदी एकनिष्ठ कार्यकर्ते फयाज पठाण यांची निवड करण्यात आली. 

प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले 

तसेच पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 

याप्रसंगी नांदेड उत्तरचे नवनिर्वाचित 

जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम भाई किनवटकर आणि नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित 

जिल्हाध्यक्ष इनामदार जकरीया, 
नांदेडचे नवनिर्वाचित महानगराध्यक्ष 
सय्यद ज़मीर 
यांचासुद्धा प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी सत्कार केला. 
या निवडीबद्दल शेख उस्मान टेलर 

(हिंगोली) मोहसीन पठाण (मराठवाडा अध्यक्ष), ॲड. कामरान खान (मराठवाडा कार्याध्यक्ष), 

ॲड. अयाज सुभानी (मराठवाडा उपाध्यक्ष), नवीद अहमद (मराठवाडा सचिव),जुबेर पठाण

 (विदर्भ अध्यक्ष), डाॅ. नदीम शेख (जिल्हाध्यक्ष बीड), ॲड. सद्दाम खान (जिल्हाध्यक्ष परभणी), 

सय्यद करीम बिल्डर (जिल्हाध्यक्ष जालना), अकीब पटेल (जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद), जब्बार पठाण (जिल्हाध्यक्ष हिंगोली), 

मुबीन पठाण (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद), मोहम्मद अवेस (जिल्हाध्यक्ष यवतमाळ), सलाउद्दिन हाश्मी (हिंगोली),

 शाहरूख खान (जिल्हा सचिव), फेरोज पटेल (जिल्हा संपर्कप्रमुख), 

अब्दुल तौफिक (शहर उपाध्यक्ष नांदेड), शेख शाकीर (किनवट), मोहम्मद शहबाज (मुदखेड), खुर्रम बेग (धर्माबाद),

 शेख इरफान (बिलोली), शेख जावीद (माहूर), जुनेद अत्तार (कंधार), इ. नी अभिनंदन केले.