Ticker

6/recent/ticker-posts

मारेगाव (खा) येथील शेतकऱ्यां च्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान .किनवट ता.प्र दि २२ मागील २४ तासा पासुन पावसाची संततधार सुरु असुन पैनगंगेसह तालुकाभरातील लहान मोठ्या नाल्यांना पुर आले असुन किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव(खा) येथील शेत शिवारात पाणी


मारेगाव (खा) येथील शेतकऱ्यां च्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान .
किनवट ता.प्र दि २२ मागील २४ तासा पासुन पावसाची संततधार सुरु असुन पैनगंगेसह तालुकाभरातील लहान मोठ्या नाल्यांना पुर आले असुन किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव(खा) येथील शेत शिवारात पाणी 

पैनगंगा नदीचे घुसल्याने मारेगाव (खालचे) येथील शेतकऱ्यांचे पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे सदर गावातील काही 

शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही ज्या शेतकऱ्यांनी विमा पीक विमा काढलेला आहे 

त्या शेतकऱ्यांची पिक विमा कंपनीचे कडे धाव घेण्या चा प्रयत्न करत आहेत, 

व ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरकारी अनुदानाची अपेक्षा शासनाकडून त्वरित देण्याची  आहे.

 तसेच किनवट तालुक्यातील नांदेड, उमरखेड, मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे 

पैनगंगेच्या पुराचे पाणी किनवट येथिल गोशाळेत शिरल्याने तेथिल गाई सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्या आहेत, 

गंगानगर, मोमिनपुरा, नालागड्डा परिसरातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 
तालुकाभरातील नदि काढच्या नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

तर नगर परिषदेने ही संभाव्य पुर परिस्थिती पाहता पुरग्रस्त भागातील काही कुटुंबाना सुरक्ष्क्षित स्थळी हलवण्यात आल्याचे 

नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , उपनगराध्यक्ष वेंकट नेम्मानिवार यांनी सांगितले आहे.
        

तालुक्यातील इस्लापुर परिसरात नाल्याला पुर आल्याने इस्लापुर येथिल साईबाबा मंदिरात परिसरात पुर आला होता तर इस्लापुर ते शिवणी मार्ग बाधित झाला होता. 

सहस्त्रकुंड येथिल विहंगम धबधबा हा ओसंडुन वाहत असल्याने प्रेक्षकांनी एकच गर्दी केली आहे. 
याठीकाणी प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे तर किनवट नांदेड मार्गावरील बेंदी येथिल पुलाला आलेल्या पुरामुळे वाहतुक विस्कळीत होती. 

या सोबतच किनवट ते उमरखेड या मार्गावर आलेल्या पुरामुळे हा ही मार्ग बंद होता. 

किनवट शहरापासुन जवळच असलेल्या घोगरवाडी येथिल लहान धबधबा ओसंडुन वाहत असल्याने जवळच्या नागरीकांनी गर्दी केली आहे.
     

   किनवट ते शनिवारपेठ मार्गात कोठारी येथिल बहुप्रतिक्षित पुलावरुन पाणी ओसंडुन वाहत असल्याने जवळपास २२ गावांचा 

संपर्क तुटला तर याभागातील दुध आज शहरात येउ न शकल्याने शेतक-यांचे नुकसान झाले 

तर शहरातील नागरीकांना कृत्रिम दुध विकत घ्यावे लागले.
       
 मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नदी व नाला शेजारील शेतामध्ये प्रचंड चिबडी झाली आहे तर काही शेताचे नुकसान झाले आहे. 

शेतक-यांनी याबाबत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे असे शेतक-यांनी मागणी केलेली आहे. 

तर यामुळे मुंबई ते किनवट येणारी नंदिग्राम एक्सप्रेस देखिल मुंबई वरुन रद्द करण्यात आल्याने ती किनवट येथे येईल कि नाहि या बाबत शासंकता निर्माण झाली आहे.
      
  प्रशासनाकडुन सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक,

 तहसिलदार उत्तम कागणे, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, 

परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत तर महसुल प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात तत्पर असल्याचे तहसिलदार उत्तम कागणे यांनी सांगितले आहे.