Ticker

6/recent/ticker-posts

अवैध धंद्याविरुद्ध कडक भुमिका; विशेष मोहिमेत ३६ लाखाचा ऐवज जप्त- निसार तांबोळीनांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यात मटका, गुटखा, गांजा (एनडीपीएस) आणि दारु असे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत.


अवैध धंद्याविरुद्ध कडक भुमिका; विशेष मोहिमेत ३६ लाखाचा ऐवज जप्त- निसार तांबोळी


नांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. 

या चारही जिल्ह्यात मटका, गुटखा, गांजा (एनडीपीएस) आणि दारु असे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत.

पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी
10 Jul, 2021 , 4:30 pm
नांदेड : नांदेड परिक्षेत्रांतर्गत मटका, जुगार, दारु, गांजा आणि गुटखा असे अवैध धंदे 

जोमाने सुरु असल्याच्या तक्रारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे प्राप्त झाल्या.

 यावरुन त्यांनी या अवैध धंद्याविरुद्ध कडक भुमिका घेत शुक्रवारी (ता. नऊ) जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. 

या मोहिमेंतर्गत परिक्षेत्रात ३७० कारवाया करुन ४८५ आरोपींना अटक केली. 

त्यांच्याकडून ३६ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

या कारवायामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

 ही माहिती नांदेड परिक्षेत्र कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्राद्वारे देण्यात आली.

नांदेड परिक्षेत्रांतर्गत नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. 

या चारही जिल्ह्यात मटका, गुटखा, गांजा (एनडीपीएस) आणि दारु असे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. 

यामुळे पोलिस दलाची बदनामी होत असल्याने

 व मिळालेल्या तक्रारीवरुन पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी विशेष मोहिम राबविली. 

यापूर्वी त्यांनी चारही पोलिस अधीक्षकांची एक महत्वाची बैठक घेऊन त्यांना 
कडक शब्दात समज दिली होती.

 पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरुन चारही जिल्ह्यात विशेष मोहिम राबवत मटका, 

गुटखा, जुगार, दारु आणि गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

हेही वाचा - लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंप 

व्यवस्थापकाच्या डोळ्यात तिखट टाकून चाकूने जखमी करुन त्यांच्याकडील साडेआठ