किनवट (दुर्गादास राठोड) महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित समाजाला संविधानिक हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण ताकतीने लढणार असून या निवडणुकांच्या माध्यमातून प्रस्थापित पक्षांना शह देत महाराष्ट्रात राजकीय बदल
घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नंदूभाऊ पवार यांनी किनवट येथे केले .
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी
कार्यकर्त्यांशी चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी ते राज्यभरात दौरे करत असून विदर्भ दौऱ्यानंतर आज किनवट येथे आले
असताना गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत त्यांनी किनवट माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातील समस्या व अडचणी जाणून घेतल्या तसेच गटनिहाय व गण
निहाय इच्छुक उमेदवारांसाठी कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तर दिले
बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार,भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड व
ओबीसीनेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध महाराष्ट्रात आपण वाडी तांडे व खेड्यापाड्यात पक्षबांधणीचे काम करत असुन यापुढेही करणार.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढविण्याचा पक्षाचा निर्धार असून त्या अनुषंगाने राज्यभरात दौरे केले जात आहेत
राज्यातील प्रस्थापित पक्षांनी आजपर्यंत उपेक्षित वंचित तसेच ओबीसी व दुर्लक्षित असलेल्या भटक्या विमुक्त समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे काम केले.
मात्र यापुढे तळागाळातील उपेक्षित ओबीसी समाजाला संविधानिक हक्क व न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतीय बहुजन क्रांती दल पक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकतीने लढणार आहे.
समाजाने आपल्या अस्तित्वासाठी भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तसेच नांदेड जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी
आत्तापासूनच कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन केले.
तत्पुर्वी त्यांनी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे दर्शन घेतले
व त्यानंतर किनवट माहूर दौऱ्यावर येताना तालुक्यातील निराळा तांडा रायपूर तांडा टेंभी यासह अनेक गावात भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
बैठकीच्या औचित्य साधून बोधडी जिप गटाचे दावेदार युवा नेते सुभाष बाबू नाईक, ऍड उदय चव्हाण,
बबलू नाईक, नितीन मोहरे,नवीन राठोड,मोहन जाधव, पुनाराम जाधव,देवराव आडे,
वसंत राठोड यांनी नंदूभाऊ पवार यांचा भव्य सत्कार केला.
या बैठकीस भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाचे तालुकाध्यक्ष जयपाल जाधव सुदाम नाईक विक्रम जाधव मारुती चव्हाण साहेबराव पवार परसराम राठोड लखन