Ticker

6/recent/ticker-posts

#DilipKumar : रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला

 अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते 

पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. 

वयाच्या 98 व्या वर्षी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मागील काही दिवसांपासून श्वासोच्छवासाला त्रास होत असल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

पण आज सकाळी त्यांचे निधन झाले. 

त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अजरामर भूमिका साकारणारे, 

दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, 

अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

 हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. 
गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. यासाठी त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. 

दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

त्या अनेकदा चाहत्यांनाही दिलीप कुमार यांच्यासाठी सतत प्रार्थना करण्याचे आवाहन करायच्या