Ticker

6/recent/ticker-posts

*उच्च माध्यमिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल माजी विद्यार्थींचा जि. प. प्रा. शाळा हिप्परगाथडीच्चा वतीने सन्मान.*देगलूर - जावेद अहेमद सन 2020 - 2021 या शैक्षणिक वर्षात, छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सगरोळी येथे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत हिप्परगा थडी येथील कु.


*उच्च माध्यमिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल माजी विद्यार्थींचा जि. प. प्रा. शाळा हिप्परगाथडीच्चा वतीने सन्मान.*
देगलूर - जावेद अहेमद                         
सन 2020 - 2021 या शैक्षणिक वर्षात, छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सगरोळी येथे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत हिप्परगा थडी येथील कु. पटेल कैकाशा 

मियाँ पटेल, कु. शेख सना अब्बास मियाँ, कु.शेख सनोबर आबाश ह्या विद्यार्थिनीने अनुक्रमे प्रथम, 

द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल जि.प.प्रा. शा. हिप्परगाथडी यांच्या वतीने माजी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

सदर विद्यार्थिनींचा जि.प.प्रा. शा. हिप्परगा थडी तर्फे शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  सय्यद इलियास पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात होते.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बिलोली पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमान तोटरे साहेब , 

साधनव्यक्ती  राठोड सर व  हलगरे सर उपस्थित होते. 
विद्येची देवता सरस्वती माता व आद्यक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री राघूपती सर यांनी केले. 

*माजी विद्यार्थी* यांच्या सन्मान सोहळा हा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन 

समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम हिप्परगाथडीच्चा शाळेने केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. 

यामुळे सर्व पालकांना प्रेरणा मिळेल, 

पालकांनी शाळाच्चा भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसहभागाच्चा माध्यमातून हातभार लावावा असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
सत्कारमूर्ती विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून शाळेबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त केली. 

आमचा पाया घडवणारी, आमच्यावर शिक्षणाबरोबर संस्कार घडवणारी  ही शाळा आहे. 

आमचा सत्कार करून गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

गावातील प्रतिष्टीत व्यक्ती, पालक यांनी पण आपले  मनोगत व्यक्त केले.

सौ. तोटावाड  मॅडम यांनी आपल्या मनोगतातून पालकांना मुलीच्या शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले व मुलींना शिकवून निर्भर करा असा संदेश दिला. 

 गेंदेवाड सर यांनी लोकांना लोकवर्गणीतून शाळेचा विकास करण्यासाठी आव्हान केले. सत्कार सोहळ्यासाठी 

गावचे सरपंच विठ्ठलराव हिप्परगेकर, पोलीस पाटील मठपती शंकरअप्पा, माजी सरपंच अंजनीकर साहेबराव , 

उपाध्यक्ष सायबु एडकेवार, लक्ष्मण पाटील भूरे,  धनुरे व अनेक पालक उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगेवार सर ,  चव्हाण सर , सगरोळीकर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ.देशपांडे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन  मुत्येपोड सर यांनी व्यक्त केले.

अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.