Ticker

6/recent/ticker-posts

*किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची निवड*दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली


*किनवट पेंटर असोशियशन च्या 
अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची निवड*
दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या 
अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली.
  

   अध्यक्षीय भाषणात अरुण आळणे म्हणाले की नवीन कार्यकारिणी तयार झाल्याने पेंटर व चित्रकार कलाकारांना चांगली कामे मिळतील. 

ज्या पेंटर ने काम घेतले असेल तर कामासाठी दुसऱ्या पेंटर ने कमी पैशात काम करू नये. 

दरवर्षी अध्यक्ष बदलल्याने जोमात 
काम करता येते. 
    
 माहूर चे रणजीत वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले.

 ते म्हणाले की, सर्व पेंटर गरिबीतून वर 
आलेले आहेत. 
सर्व कलाकारांचे पोट पेंटिंग व्यवसायावर अवलंबून आहे. 

असोशियेशन ने सर्वांना आर्थिक मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. 
 
   पेंटर नागनाथ भालेराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,

 पेंटर कलाकारांनी आपला व आपल्या परिवाराचा विमा काढून घ्यावा. 

कामगार फॉर्म भरून केंद्र शासनाच्या 
योजनांचा लाभ घ्यावा, 

मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
 असे त्यांनी सांगितले. 
    

 पेंटर रमेश दिसलवार म्हणाले की, पेंटर कडून कामे करून घेतल्या जातात परंतु अडवान्स 

दिल्यानंतर बाकीची रक्कम बुडविली जाते. 
असे सांगितले.

यावेळी देविदास पेंटर, जावेद पेंटर, 
अशोकराज पेंटर, 

सुदर्शन पेंटर, लोखंडे पेंटर यांनी अनुभव कथन करून भावी कलाकारांना प्रोत्साहन दिले. 

आपल्या सोबत घडलेल्या भावना व्यक्त केल्या.
     कार्यक्रमा नंतर सर्वानुमते कार्यकारिणी 

घोषित करण्यात आली ती अशी,

अध्यक्ष-शेख हनीफ पेंटर 

उपाध्यक्ष-राठोड पेंटर / दुर्गादास भालेराव

सचिव-अनिल उमरे पेंटर/ रामेश्वर घुले पेंटर


सहसचिव-शिलरत्न पाटील / संदीप वाघाडे
कोषाध्यक्ष- प्रतिरूप पेंटर


सहकोषाध्यक्ष-नौशाद पेंटर
सदस्य- रमेश दिसलवार पेंटर, 

अजिंक्य आळणे, विनोद भालेराव, 

सुमेध कापसे.
मार्गदर्शक- अरुण आळणे, 

शकील बडगुजर, बालाजी इंदुरकर, 
सुदर्शन मारपवार, नागनाथ भालेराव.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रंचालन 
पेंटर अनिल उमरे यांनी केले. 

आभार पेंटर दिशलवार यांनी मानले.


बैठकीस वरिष्ठ पेंटर मेश्राम, 

पेंटर शे. मुस्तफा, अमोल भगत, 
लोखंडे पेंटर, 

पेंटर सुरेशवार, विनोद कातले, 
सतराम पवार, 

चोबुल खान पठाण, सुरेश पेंटर, 

विनोद भालेराव युवा कलाकार अजिंक्य 
आळणे उपस्थित होते. 

नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने सर्वांचे अभिनंदन होत आहे.