Ticker

6/recent/ticker-posts

दि,०७ /ऑगस्ट /२०२१ रोजी _ विश्व आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर कराजितेंन्द्र अ . कुलसंगे.---संपुर्ण विश्वातील आदिवासीना एकत्रित आणुन सर्वांगीण विकासाचे सन्मार्ग शोधण्याच्या हेतूने गठित संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 23 डिसेंबर 1994 च्या बैठकी मध्ये 49/214 च्या ठरावानुसार दरवर्षी 9 आगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणुन साजरा करण्या बाबत सर्वानुमते घोषित केले



दि,०७ /ऑगस्ट /२०२१ रोजी _ 
विश्व आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करा
जितेंन्द्र अ . कुलसंगे....
----------------------------------------

संपुर्ण विश्वातील आदिवासीना एकत्रित  आणुन सर्वांगीण विकासाचे सन्मार्ग शोधण्याच्या हेतूने गठित संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 23 डिसेंबर 1994 च्या बैठकी मध्ये 

49/214 च्या ठरावानुसार दरवर्षी 9 आगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणुन साजरा करण्या बाबत सर्वानुमते घोषित केले आहे.

 तेंव्हा पासुन विश्व आदिवासी दिवस हा संपुर्ण भारतभर आदिवासी जमातीकडून 

मोठ्या उत्सहाने दि. 9आगस्ट रोजी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

महाराष्ट्र या राज्यात ही हा दिवस अतिशय जल्लोषात व मोठ्या उत्साहात प्रचंड प्रमाणात साजरा केला जातो. 

या दिवशी संपुर्ण आदिवासी जमाती एकत्र येतात आणि सांस्कृतिक ठेवा प्रकट करत महामानवाला व दैवताला अन निसर्गाला वंदन करतात.

या दिवसाचे औचित्य साधून 

आनंदात नृत्य व वेशभुषा व्यक्त करत सांस्कृतिक अस्मिता जपतात.संविधानिक हक्क अधिकार , 

शिक्षण आरोग्य अशा विषयावर 
विचार मांडतात.
      
  नुकतेच राजस्थान सरकारने  विश्व आदिवासी दिवस 9 आगस्ट 2020 रोजी या दिवसाची सार्वजनिक सुट्टी घोषित करून 

तेथील आदिवासी जमातीच्या जन भावनेला न्याय दिले आहे. 

राजस्थान सरकारने घेतलेल्या या
 निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात 

सुद्धा विश्व आदिवासी दिवस कोविड 19 चे नियम पाळून मोठ्या उत्सहाने सर्व स्तरावर 

साजरा करण्यासाठी या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करून राज्यांतील 

सुमारे 10% लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाला न्याय द्यावे.
           
 अशा आशयाचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत  भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड जिल्हा 

उपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविले आहे.