Ticker

6/recent/ticker-posts

*आज दि. 23 आगस्ट म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या चित्रपट क्षेत्रातील सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहणारा दिवस . बरोबर 29 वर्षांपूर्वी भास्कर वाडेकर यांनी बुलडाणा जिल्ह्यात " कर्तव्य " मालीकेचा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचे निर्माता स्व. सुधाकर बोकाडे साहेब यांच्या शुभहस्ते शुभारंभ करुन बुलडाणा जिल्ह्यात चित्रपट क्षेत्राची स्थापना केली


आज दि. 23 आगस्ट  म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या चित्रपट क्षेत्रातील सुवर्ण अक्षरांनी इतिहास  लिहणारा दिवस . बरोबर 29 वर्षांपूर्वी भास्कर वाडेकर यांनी बुलडाणा जिल्ह्यात " कर्तव्य " 

मालीकेचा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचे निर्माता स्व. सुधाकर बोकाडे साहेब यांच्या शुभहस्ते  शुभारंभ करुन बुलडाणा जिल्ह्यात  चित्रपट क्षेत्राची स्थापना केली . 

29 वर्षात भास्कर वाडेकर यांनी 6 पुर्ण लांबीचे मराठी चित्रपट , 

2  बालचित्रपट , मुंबई दुरदर्शन करीता 1 टेलिफिल्म व 26 लघुचित्रपटांची यशस्वी निर्मीती , लेखन व दिग्दर्शन केले आहे  व 3 चित्रपट सेन्सॉर सुद्धा केलेले आहे 

आणि  चित्रपटाविषयी 15 माहितीपटाची यशस्वी निर्मीती केली आहे . 

सर्व फिल्म YouTube ला buldana film society channel वर उपलब्ध आहेत .

त्यांचा चित्रपट वारसा सुरज भास्कर वाडेकर हे चालवत  आहेत.त्यांची " आपले पर्यावरण " ही short film ची भारतासह 10 देशात म्हणजे 

१) भारत २) पाकीस्तान ३) बांगलादेश ४) चीन ५) इटली ६) स्पेन  ७) इंग्लंड ८) न्युयॉर्क ९ दक्षिण फ्लोरिडा १०) लांस एंजेलिस .तर देशात १) महाराष्ट्र २) प.बंगाल ३) मध्य प्रदेश ४) उत्तर प्रदेश 

५) कर्नाटक ६) जम्मू काश्मीर ७) राजस्थान ८) बिहार इ. राज्यात  आजपर्यंत 45 आंतरराष्ट्रीय  चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे .

 ह्याच फिल्म ला औ.बाद -2 , मुंबई -1 , वर्धा -2 , ग्वाल्हेर -1 बिकानेर -1 व टेक्सास सिटी अमेरिका 1 असे 8  विविध Best Film पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .
 "पेन ही short film ची सुद्धा भारतासह 5 देशात 10 फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झालेली आहे तसेच 

short film जिद्द , सोन्याचा हंडा , पद्मश्री , माणूस , अशा अनेक फिल्म ची फेस्टिव्हलमध्ये निवड झालेली आहे . 

सर्व सहभागी कलाकारांना ते धन्यवाद देतात . आणि गेल्या 11 वर्षांपासून ते " बुलडाणा फिल्म फेस्टिव्हल " घेत आहेत . 

तसेच गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा " कला गौरव पुरस्कार " देऊन सन्मान करतात. बुलडाणा जिल्ह्यातील 

चित्रपट क्षेत्रातील वाटचाल अशीच यशस्वी व्हावी व जिल्ह्यात अनेक कलाकार ,
 निर्माता व दिग्दर्शक तयार व्हावे हीच सदिच्छा