Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्रामपंचायतच्या वतीने डेंगू वर मात करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी यांनी कंबर कसली-पी व्ही रावळे


गोकुंदा ग्रामपंचायतच्या वतीने डेंगू वर मात करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी यांनी कंबर कसली-पी व्ही रावळे

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

मागील पंधरा दिवसांपासून सततच्या पाऊस पडत असल्याने जागोजागी पावसाचे पाणी साचून मलेरिया टायफॉइड डेंगू चा वाढता 

प्रभाव लक्षात घेऊन गोकुंदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पी.व्ही रावळे यांनी मागील 

आठवडाभरापासून आपल्या कर्मचाऱ्यांसह व कुंदा येथील सर्व वाडा मध्ये धूर फवारणी करून स्वच्छता मोहीम राबविले 

असून नागरिकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी असे आव्हान ग्राम विकास अधिकारी पी व्ही रावळे यांनी केले आहे.


गोकुंदा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी व त्यांचे कर्मचारी हे डेंगू आजार विरुद्ध कंबर कसली 
असून विविध उपक्रम राबवून प्रत्येक वार्डात खड्डे कचरा चे ठिकाण व सांडपाणी 

यामुळे ज्यामुळे डेंगू ताप मलेरिया अंगदुखी डोकेदुखी सारखे आजार पसरू नये म्हणून शहरातील प्रत्येक वार्डात 

आवश्यक फवारणी करण्यात येत  असून सर्व नागरिकांनी डेंगू या महाभयंकर आजारापासून सावध राहण्यासाठी प्रयत्न  करून 

आपले परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आव्हान ग्राम विकास अधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.