Ticker

6/recent/ticker-posts

गायराणपट्टे धारक भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर यांचा हल्ला बोल मोर्चा नायगावतहसिलवर धडकला


गायराणपट्टे धारक भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर यांचा हल्ला बोल मोर्चा नायगावतहसिलवर धडकला

प्रतिनिधी 

नायगाव तालुक्यातील ईज्जतगाव येथे गायराणपट्टे धारक भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर  यांच्या भर पिकाची तहसिलदार यांच्या आदेशानी नुकसान करुन ताबा घेणाऱ्या तहसिलदार व संबंधितावर  

योग्य ते कार्यवाही करून गायरान पट्टे नावावर करावे म्हणून अखिल भारतीय किसान सभा नांदेड यांच्या वतीने 

दि 13 आँगस्ट 21 रोजी काँ. अशोक घायाळे यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. 
  

  हा मोर्चा मेन रोडने तहसील कार्यालय पर्यंत घोषणेने परिसर दणाणून गेला मोर्चास मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
   

  या मोर्चास पि डी वासमवाड,चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,ज्ञानेश्वर पोटफोडे, 
विकास अधुरे, 

रावसाहेब पवार, मानेची पाटिल ईत्यादी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
      

    मा संस्थापक अध्यक्ष  चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांगाना कोणीही आधार देत 
नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, 
गायरान जमीन, मसुुरा जमीन,

 परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग, शेतमजूर, गायराण पट्टेधारक 
बांधवांच्या नावावर दिले 

तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होईल 

शासनाच्या तिजोरीत वाढ होईल
म्हणून शासन प्रशासन यांना जागे 
करण्यासाठी संघटित होण्याचे 
आव्हान डाकोरे 
पाटिल यांनी केले. 
 
अखिल भारतीय किसान मजदूर सभा केंद्रीय सचिव अशोक घायाळे यांनी नायगाव तालुक्यातील ईज्जतगाव 

येथील गायरान कास्तकाराचे गट क्र 64 मधील पिक पे-याचे नुकसान जातीय भावनेतून द्वषभावनेतुन 

तहसिलदार यांच्या लाच मागणीची पूर्तता न केल्याने करण्यात आली.असा आरोप
 काँ अशोक घायाळ यांनी केला. 
        

मोर्चा चे निवेदन शिष्टमंडळाने दिले ते निवेदन तहसिलदार साहेब यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री महोदय . 

गृहमंत्री महोदय, महसुल मंञी, 
समाजकल्याण मंञी, 

आदिवासी मंञी,मुख्य सचिव ईत्यादीना निवेदनाद्भारे दिले. 
  

   मोर्चा यशस्वी करण्यासाठी गुंडाळी बोयाळ,सोपान नरहरी, 


वाघमारे गंगाधर, रावसाहेब पवार, ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते 
      असे प्रसिध्दी पञक देण्यात आले