Ticker

6/recent/ticker-posts

*"प्रशासकीय बदली झालेल्या जण मित्राचा गावकऱ्यांनी घोड्यावरुन मिरवणूक काढून दिला निरोप"* *शाल पुष्पहारासह सोने-चांदीच्या भेटवस्तू देऊन दिला निरोप


प्रशासकीय बदली झालेल्या जण मित्राचा गावकऱ्यांनी घोड्यावरुन मिरवणूक काढून दिला निरोप"* *शाल पुष्पहारासह सोने-चांदीच्या भेटवस्तू देऊन दिला निरोप ==============

देगलूर -  जावेद अहेमद                          नांदेड 

जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा 

या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या मौजे हाणेगावात महावितरण विभागाच्या एका 

जनमित्राचा  प्रशासकीय बदली झाल्याने गावकऱ्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढून निरोप दिला आहे 
   
  सचिन त्र्यंबकराव पतंगे असे या जण मित्राचे नाव असून 33 केव्ही उपकेंद्र हाणेगाव येथे

 जन मित्र म्हणून प्रथम नेमणूक 2014
 रोजी रुजू झाल्यापासून 2021 पर्यंत
 म्हणजे जवळपास सात वर्ष गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची ऊन ,वारा, पाऊस, रात्र बेरात्र निस्वार्थपणे सेवा बजावली.... 

आज पर्यंत सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यापेक्षा तत्पर सेवा दिल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या सेवेची नोंद घेत 

भारतीय स्वातंत्र्य दिन दिनांक 15 ऑगस्ट चे औचित्य साधून सचिन पतंगे यांना शाल श्रीफळ 

पुष्पहाराने स्वागत करून इतकेच नव्हे तर सोने व चांदीचे भेटवस्तू देऊन घोड्यावर बसवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली आहे 

यामुळे महावितरण विभागासह प्रशासकीय सेवा देणाऱ्या अनेक विभागासाठी ही एक प्रेरणादायी विषय ठरला आहे . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत रेड्डी उप व्यवस्थापक देगलूर हे होते, 

तर प्रमुख उपस्थिती पदी व्ही. एम. गारगोटे उपकार्यकारी अभियंता देगलूर ,

गजानन भोयेवार शाखा अभियंता हाणेगाव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

 याप्रसंगी हाणेगाव चे माजी सरपंच 
प्रशांत देशमुख, 
जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीप बंदखडके, ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार, योगेश देशमुख, राजेश पंदरगे, शिवाजीराव आडेकर , 

शेतकरी संदीप पोकलवार, बालाजी पोकलवार, प्रवीण इनामदार. संतोष फुलारी, नितीन जिरगे, उमाकांत पंचगल्ले, महादेव ऊपे ,

अभियंता भरत तांदळे, एस एम राऊत आर एस रेड्डी एन जी टेकाळे ए. एस. आत्राम, पी. एल. पटले यांच्यासह गावातील नागरिक व मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती

 या कार्यक्रमाचे आयोजन रमाकांत फुलारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चलवे यांनी केले तर आभार सचिन पतंगे यांनी मानले