Ticker

6/recent/ticker-posts

चिरंतन महात्मा बसवेश्वर ग्रंथ प्रकाशन म्हणजे अतुलनीय सामाजिक दस्तावेज आहे इंजि.श्रीकांत पाटील हंगरगेकर


चिरंतन महात्मा बसवेश्वर ग्रंथ प्रकाशन म्हणजे अतुलनीय सामाजिक दस्तावेज आहे   इंजि.श्रीकांत पाटील हंगरगेकर
देगलूर  :-   ( प्रतिनिधी )

        

   जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील चळवळीचे प्रमुख केंद्र होते . या महामानवाच्या जीवनाचा प्रवास अतिशय खडतर स्वरूपाचे होते . 

संकटांना सामोरे जाऊन समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कार्य करणाऱ्या महापुरूषापैकी महात्मा बसवेश्वर यांचे नाव अभिमानाने घेतले जाते . " चिरंतन महात्मा बसवेश्वर " 

हा ग्रंथ प्रकाशन म्हणजे अतुलनीय सामाजिक दस्तावेज आहे असे मत वीरभद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. श्रीकांत पाटील हंगरगेकर यांनी व्यक्त केले .
       

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरभद्र शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष इंजि.श्रीकांत पाटील हंगरगेकर , 

प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे , सचिव रणजीत पाटील हंगरगेकर , 

प्रमुख उपस्थिती सदस्य बाबुराव कुलकर्णी , मा.अधीक्षक पांडुरंग चमकुरे , हणमंत पताळे , प्राचार्य डॉ. एस.बी.आडकिने , 

उपप्राचार्य के.बालाराजू  प्रा.सी.बी.साखरे हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सी.एन.एकलारे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. पी.ए.जोशी यांनी केले .
            

 मान्यवरांचा यथोचित शाल , श्रीफळ , पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. 

एस.बी.आडकिने यांनी करत असताना ग्रंथ निर्माण करण्याच्या मागचे उद्देश , वर्तमान काळातील महत्त्व , महाविद्यालयातील यशस्वी वाटचाल ,

 प्राध्यापकांच्या विधायक कार्यास प्रोत्साहन इत्यादी गोष्टीवर प्रकाश टाकला . 

संपादकीय मनोगतात प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर यांनी ग्रंथ निर्माण करण्या मागील भूमिका , यशस्वी वाटचाल आणि सर्वांचे आभार मानले. 

या ग्रंथाचे मौलिक चिंतन मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे यांनी करत असताना असे सांगितले की , 

महात्मा बसवेश्वर हे जनसामान्यांना हक्क , न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले होते . त्यांनी ग्रंथावर भाष्य करीत असताना एकंदरीत सर्वच पैलूंवर विचार व्यक्त केले . 
      

     चिरंतन महात्मा बसवेश्वर हा ग्रंथ श्रीकांत पाटील हंगरगेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला . 

एकंदरीत या ग्रंथाच्या सुबक व आकर्षक मांडणी पाहून सर्वजण मुख्य संपादक 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिने , संपादक प्रा. डॉ. सी. एम. कहाळेकर , सहसंपादक प्रा. डॉ.एस. के. मंगनाळे , 

ए.बी.गजमल व संपादक मंडळाचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या यशस्वी कारकिर्दीवर संस्थेचा पूर्ण विश्वास आहे . 

अशाच प्रकारे वेगवेगळे उपक्रम महाविद्यालय स्तरावर राबवणे आवश्यक आहे .

 आपल्या चांगल्या कामाच्या पाठीशी संस्था सदैव तयार आहे . महाविद्यालयातील इतरही प्राध्यापकांनी मिळून अशा प्रकारच्या ग्रंथाचे प्रकाशन करत राहावे . 

ज्यामुळे महाविद्यालयाचा नावलौकिक होऊन समाजाला हातभार लावल्याचे समाधान प्राप्त होईल . 

शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रत्येकाने करीत रहावे असे विचार उद्घाटक यांनी मांडले . अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची कास धरावी . 

समाजाला योग्य दिशा देण्यासाठीच महापुरुषांचा जन्म झालेला असतो . समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य महापुरुष करीत असतात .

 प्रत्येक महापुरुषावर ग्रंथ प्रकाशित करावे . आपल्या कार्यामध्ये संस्थेचे सहकार्य राहील असे मत प्रकट केले . 

मुख्य संपादक , संपादक , सहसंपादक यांचे सत्कार करण्यात आले . कोरोनाचे नियम पाळून बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .