Ticker

6/recent/ticker-posts

मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मेहर अली, राष्टसेवादल, एन ए पी एम आणी इनक्रेडिबल समाजसेवक गृप यांच्या सदस्याची एक शिष्टमंडळ कोकण दौऱ्यावर गेले होते. मानगाव, महाड, तळये या भागातील पीडीत नागरीकांना भेटि देऊन त्यांच्या पुनर्वसनाच्या



मेधाताई पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मेहर अली, राष्टसेवादल, एन ए पी एम आणी इनक्रेडिबल समाजसेवक गृप यांच्या सदस्याची एक शिष्टमंडळ कोकण दौऱ्यावर गेले होते. 
मानगाव, महाड, तळये या भागातील पीडीत नागरीकांना भेटि देऊन त्यांच्या पुनर्वसनाच्या मागण्या व वारंवार होत 

असलेले निसर्गाच्या घटनाबाबत तेथील ग्रामस्थ, सरपंच, समाजसेवक यांच्याशी सखोल चर्चा करण्यात आली. 


तळयी तेथे दरडी कोसळून संपूर्ण गाँव जमिनीखाली गाडले गेले 

येथे आंदाजे 87 ग्रामस्थाचा मृत्यू झाला यावर एक ग्रामस्थच्या भावना "आम्हाला सध्या राशन अथवा इतर साह्याची गरज नाही 

महाराष्ट्र सरकारने तीन दिवसात 350 ग्रामस्थच्या खात्यात पाच पाच लाख रुपये टाकले आहेत आम्हाला गरज आहे 

ती पुनर्वसनासी पुर्वी आमची मोठमोठी घरे होती परंतु म्हाडाच्या माध्यमातून आम्हाला 400 चौ फूट घरे दिली जाणार आहेत.  


याच बरोबर अनधिकृत बांधकामे निसर्ग मधील बदल डोंगर पोखरणी आणी चुकीच्या पद्धतीने तयार होत असलेला महामार्ग या मुळे 

असे प्रकार वारंवार येथे घडणाराच यावर राज्य आणि केंद्र सरकार यांनी ठोस उपाय योजना करावी निसर्गाशी होणारा खेळ थाबवावा. 


"महाड भागात नदिच्या पुरामध्ये ज्या पद्धतीने माती वाहून आलीय ती खुप मोठी धोक्याची सूचना आहे. "


पर्यावरणाची काळजी घेणे अवैद्य भुखनन,बाधकामे या मुळे ग्लोबल वॉर्मिंग मुळे जगात आश्याप्रकारच्या घटनांमध्ये वाढच होणार. 


यावेळी पुण्यातून इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, एन ए पी एम च्या राष्ट्रीय समन्वय सुनिती सुर, 

इब्रिहिम खान, राष्टसेवादलाचे वरिष्ठ पदाधिकारी विलास किरोते, मनिष देशपांडे आणि मेहर अली संस्थाचे कार्यकर्ते या टिम मध्ये सामील होते. 


कोकण घटनेचा अहवाल आणि निवेदन बनवून पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांना देण्याचे प्रसिद्ध समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी सांगितले.