Ticker

6/recent/ticker-posts

किनवट प्रतिनिधी किनवट येथील गर्जे जयभिमचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संगीत विशारद दीपक ओंकार यांना संगीत व समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आज किनवट येथील जय मल्हार प्रतिष्ठान कार्यालयात महिला मंडळ व समाज बांधवांच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला


किनवट प्रतिनिधी किनवट येथील  गर्जे जयभिमचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संगीत विशारद दीपक ओंकार यांना संगीत व समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आज किनवट 

येथील जय मल्हार प्रतिष्ठान कार्यालयात महिला मंडळ व समाज बांधवांच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला
 
गर्जे जय-भीमच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा घरोघरी 

पोहोचविणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 
तथा संगीत विशारद 

दीपकदादा ओंकार यांचे सामाजिक व संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 
अ भा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ महार बटालियन आदिलाबाद 

टाउन आणि अण्णाभाऊ साठे मेमोरियल असोसिएशनने त्यांना महाकवी वामनदादा कर्डक 
संगीत पुरस्कार व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार जाहीर केला

असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिलाबाद येथे 

दिनांक 25 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या आंबेडकरी कला महोत्सवात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
 या पुरस्काराबद्दल आज किनवट येथील जय मल्हार प्रतिष्ठान कार्यालयात दीपक ओंकार 

यांचा समाजबांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला सामाजिक 
उत्तरदायित्व म्हणून मी

 बहुजन विचारधारा समाजात रुजविण्याचे काम करत आलो त्याचबरोबर संगीत क्षेत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करतो. दीनदुबळ्या, शोषित, 

पीडित समाजासाठी काम करण्याची ऊर्जा केवळ फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतुनच मिळते अशा भावना सत्कारमूर्ती ओंकार यांनी व्यक्त केल्या
  तर जयश्री भरणे यांनी आपल्या मनोगतातून दीपक ओंकार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा गौरव होणे आवश्यक आहे. 

आदर सन्मानतूनच आदर्शवादी समाज तयार होत असल्याचे ते म्हणाले यावेळी व्यंकट भंडारवाड,
 प्रशांत कोरडे, गंगुबाई परेकार, कविता गोणारकर, शेख परवीन, रजिया शेख,  चंद्रकांत कांबळे,

 नसिर तगाळे, गंगाधर कदम,वसंत राठोड, आकाश पवार, पापेंद्र कनाके, राम धुर्वे यांच्यासह दीपक ओंकार यांचे चाहते उपस्थित होते