Ticker

6/recent/ticker-posts

किनवट, दि.१२(सा.वा.) : किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार (भा.प्र.से) व तहसीलदार डॉं. मृणाल जाधव यांना किनवट जिल्हा निर्मिती व मांडवी, सारखणी, बोधडी, इस्लापुर तालुका घोषित करण्याबाबत निवेदन देऊन


किनवट, दि.१२(सा.वा.) : किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार (भा.प्र.से) 
व तहसीलदार डॉं. मृणाल जाधव यांना 

किनवट जिल्हा निर्मिती व मांडवी, सारखणी, बोधडी, इस्लापुर तालुका घोषित करण्याबाबत निवेदन देऊन 

तालुक्यातील ज्वलंत प्रश्ना बाबत व नागरीकांना प्रशासकीय कामा संबधी भेडसावणा-या समस्या बाबत चर्चा केली.
  

दि. १२ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मासिक सभा श्री साई कल्यान मडप येथे संपन्न झाली 

या बैठकीत तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नाबाबत चर्चा घडवुन आणली 

किनवट जिल्हा व्हावा यासाठी अनेकवेळा यापुर्वी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्यात आले होते 

आता या प्रश्नाला घेऊन मराठी पत्रकार परिषद किनवट शाखेच्यावतीने मोठे 

जन आंदोलन उभे करुन किनवट जिल्हा झाल पाहिजे व इस्लापुर मांडवी 
तालुके घोषित झाले पाहिजे 

जो पर्यंत हि मागणी पुर्ण होणार नाही तो पर्यंत विविध प्रकारचे आंदोलन 

करण्याचा इशारा निवेदनात
 नमुद केला आहे. 

सहाय्यक जिल्हाधिकारी यांची भेट 
घेऊन या मागणीचे निवेदन दिले

 व तालुक्यातील ज्वलंत विषयावर चर्चा घडवुन आणली त्या नंतर या मागणीचे 

निवेदन तहसिल कार्यालयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी 

मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, सचिव प्रकाश कारलेवाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप वाकोडीकर ,

किशन भोयर, के. मुर्ती, फुलाजी गरड पाटील, गंगाराम गड्डमवार, प्रमोद पोहरकर, किरण ठाकरे , 

कचरु जोशी, अडेलू बोनगिर, 
बालाजी शिरसाठ, जयपाल जाधव 
यांची उपस्थिती होती.