Ticker

6/recent/ticker-posts

आज दि. १२ अॉगस्ट २०२१ गुरुवार रोजी जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड,ता.खामगाव,जि.बुलडाणा शाळेस मा. जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयामार्फत एकूण ४१ प्रकारातील ३६२ बाबी प्राप्त झाल्या आहेत


हिवरखेड शाळेस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून क्रीडा साहित्य प्राप्त

आज दि. १२ अॉगस्ट २०२१ गुरुवार रोजी जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड,ता.खामगाव,जि.बुलडाणा शाळेस मा. जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयामार्फत एकूण ४१ प्रकारातील ३६२ बाबी प्राप्त झाल्या आहेत. 

वर्षभर शालेय मैदानावर घेतल्या जाणा-या  क्रीडास्पर्धा व विविध खेळांसाठी लागणारे साहित्याचा यात समावेश आहे.

यात थाळी, गोळे, भाले, मैदानावरील  सांकेतिक रंगीत कोण, रॅली बॅटन, मैदान मोजण्याचा टेप,इलेक्टॉनीक वेटींग मशीन, बॅडमिंटन रॅकेटस्, शटल, हॅण्डबॉल, हॉलीबॉल, फुटबॉल, रोप मल्लखांब, लगोरी सेट, खोखो पोल्स, टेनीक्वीट रिंग, 

चेसबोर्ड, कॅरम बोर्ड,क्रिकेट बॉल बॅट स्टंम, फोर इन वन हर्डल, फ्लाईंग डिस्क फ्रिसबी, ट्रॅम्पोलाईन, लेझीम,हाईट मेजरींग स्टॅण्ड, स्टॉप वॉच,

 योगा मॅट, स्किपींग रोप, रस्सीखेच दोर, शुटींग बॉल, डॉजबॉल, बिग ड्रम, साईड ड्रम, बासरी, झांज,इ. साहित्य प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. रामदास मिरगे व शिक्षक यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक  प्रतिसाद देत 

हिवरखेड येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांनी प्रयत्न करून 
शाळेस ग्रामपंचायत कडून मैदानासाठी जवळपास ८००० स्वेअर फुट शाळेलगत असलेली खुली जागा भेट दिली आहे. 
शाळेतील मुलांमधे लहान वयातच शारिरिक क्षमतेसह विविध कौशल्ये विकसीत व्हावीत तसेच गावातील विद्यार्थ्यांमधून भविष्यातील अनेक खेळाडू निर्माण व्हावेत ही गावक-यांची यामागील भूमिका आहे. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आलेल्या या साहित्यामुळे आता सर्वांच्या आनंदात भर पडली आहे.

 यासाठी खामगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. गजानन गायकवाड यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व गावक-यांचे कौतुक व अभिनंदन केले.