Ticker

6/recent/ticker-posts

*तडखेल येथे इन्साफच्या वतीने मोहरम निमित्त शरबत वाटप*


*तडखेल येथे इन्साफच्या वतीने मोहरम निमित्त शरबत वाटप*

 *देगलूर/प्रतिनिधी*

       

   देगलूर तालुक्यातील तडखेल येथे इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद स.अ.स. यांचे नातु हजरत एमाम ऐ हुसेन व करबला 

लढाईतील शहिदांच्या शहादत 
निमित्त शरबत वाटप करण्यात आले.
     

   हजरत इमाम ऐ हुसेन व करबला लढाईतील शहिदांच्या स्मरणार्थ 

यौमे अशरा निमित्त शरबत 
वाटप करण्यात आले. 

असत्यावर सत्याचा विजय व सत्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे 

हजरत एमाम ऐ हुसेन यांचे 
आदर्श उदाहरण आहे. 

इस्लाम धर्माचा पहिला महिना मोहरम सुरू आहे. यानिमित्ताने देगलूर 

तालुक्यात नेहमीच हिंदू-मुस्लिम
 एकतेचे दर्शन होते.

 यौमे अशरा निमित्त करबला लढाईतील शहिदांच्या स्मरणार्थ  ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ शाखा तडखेल च्या वतीने

 तडखेल येथील बसस्थानक येथे शरबत वाटप करण्यात आले.
    
     यावेळी कार्यक्रमास ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ चे तालुका अध्यक्ष शेख असलम, नाजीम शहा,

 वसीम शहापूरकर, शेख इम्रान देगलूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

व तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी तडखेल शाखा प्रमुख शेख कलीम,

 सादिक शेख,फारुख पटेल, 
अयूब भाई, मोहमद शहा, 

सय्यद दस्तगीर, करीम पटेल, बाबाराव कदम पाटील, चांद पटेल, नयुम शेख, कुतुब शेख, मेराज पटेल, 

अकरम चाऊस, सैलानी अयमद शेख, करीम पटेल, खायुम शेख, निसार शेख, शरीफ गाडगे आदींनी परिश्रम घेतले.