किनवट/प्रतिनिधी- राष्ट्रीय महामार्ग १६१(ए) कोठारी (चि.) ते हिमायतनगर पर्यंत होत असलेल्या निकृष्ट दर्जाहीन कामास तात्काळ थांबवून निष्क्रिय कंत्राटदाराचे तात्काळ हकालपट्टी करून नवीन कंत्राटदार नेमावा
आणि अशोक स्तंभ ते आंबेडकर चौक पर्यंत चे काम मूळ अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावे.
अन्यथा दि. २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर प्राणांतिक
उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजनाथ करपुडे पाटील, युवा सेनेचे प्रशांत कोरडे आणि अमरदीप कदम यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग कोठारी ते हिमायतनगर या ५७ कि.मी. रस्त्याचे काम ५४५ कोटी अंदाजे किमतीचे संबंधित कंत्राटदाराकडून
अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे.
मागील साडेतीन वर्षापासून हे काम चालू असून अद्याप पर्यंत पन्नास टक्केही काम पूर्ण झालेले नाही. या निकृष्ट व अंदाजपत्रकास बगल देऊन होत असलेल्या
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाहिन कामा विरोधात येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला आहे.
आज दि. २ ऑगस्ट रोजी किनवट येथील एका कार्यालयात शिवसेनेचे तालुका
संघटक व्यंकट भंडारवार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या परिषदेत त्यांनी दि. २२ जुलै रोजी ना. नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांना निवेदन
पाठवून त्या निवेदनात राष्ट्रीय महामार्ग १६१ (ए) बद्दल माहिती नमूद केली आहे.
त्या निवेदनात संबंधित कंत्राटदार
कृष्णानंद राठी
हा अंदाजपत्रकास बगल देऊन अत्यंत निकृष्ट दर्जाहीन कामे करीत असल्याचा उल्लेख केला आहे.
सदर निकृष्ट कामाबद्दल विचारपूस करणाऱ्या नागरिकांना विविध पक्षाच्या नेत्यांना सदरील कंत्राटदार हा
अरेरावीची भाषा वापरतो म्हणून संबंधित राठी या कंत्राटदाराचे निकृष्ट काम तात्काळ
थांबवुन त्याची हकालपट्टी करून नवीन कंत्राटदार नेमावे अशी मागणी केली आहे.
तर शहरातील अशोकस्तंभ ते आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता मूळ अंदाजपत्रका
प्रमाणे करण्यात यावा
अन्यथा २१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मा.ना. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर
येथील निवासस्थानासमोर प्राणांतिक उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवार,
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील,
युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख
प्रशांत कोरडे,
अमरजीत कदम यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती खा. हेमंत पाटील,
आमदार भीमराव केराम,