Ticker

6/recent/ticker-posts

*माहूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार**पोलीस कर्मचारी, पत्रकार व आशाताईंना केले सन्मानीत*


*माहूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार*

*पोलीस कर्मचारी, पत्रकार व आशाताईंना केले सन्मानीत*

माहूर वार्ताहार) :— कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये जिवाची बाजी लावून जनतेची अविरत सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला. 

सत्काराचा हा कार्यक्रम वाई (बाजार) येथे ४ रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन प्रहार चे नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले 

सदर कार्यक्रमास माहूर तालुक्यातील तमाम बडे प्रशासकीय अधिकारी,

 प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 

प्रहारचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमीत्ताने हा कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतल्याचे समजते.


काम करणाऱ्यांची उर्जा वाढविण्याकरीता त्यांचा यथोचित सत्कार करणे आवश्यक असल्याचे गमक लक्षात घेवून

 माहूर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. 

४ रोजी हा सत्कार सोहळा येथील प्रा. आ. केन्द्राच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात घेण्यात आला. सदर कार्यक्रमाची धुरा प्रहारचे तालुकाध्यक्ष अमजदखान पठाण यांचेकडे होती. 

कार्यक्रमास माहूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे, 

स.पो.नि. भालचंद्र तिडके यांचे सह ईतर हि प्रशासकीय अधिकारी 

कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तहसीलदार म्हणाले की, 

प्रशासन सदैव आपल्या कार्यात तत्पर असते आपण हि आम्हास सहकार्य करून आपली भुमिका चोख पार पाडावी, जेनेकरून संकटाचा सामना आपण योग्यरित्या करू शकू. 

आरोग्य विभागाच्या व्यथा डॉ. भिसे यांनी मांडल्या व प्रारंभी विलगीकरणाच्या वेळी 

व मग लसीकरणावेळी आलेले बरे वाईटअनुभव त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

यावेळी उपरोक्त मान्यवरांसह व्यासपिठावर पो.उप.नि. जयसिंग राठोड, 

भोपळे, डॉ. श्रिनिवास हुलसुरे, तलाठी वर्षा ढाळके, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ नाईक,

 शिवसेनेचे युवा नेते यश खराटे, रमेश गावंडे,  प्रहारचे प्रितपालसिंह साहू, 

विजयाताई काचावार,  किनवट माहूर विधानसभा प्रमुख  सतीश भाऊ बोनतावार ,शिवचरण राठोड, 

शिवचरण ठाकूर, सुभाष दवणे,दत्ता बोबडे,
अन्नू भाई,जावेद सर,गजानन केळकर,

गजानन किनाके ,सह अ.भा. म. पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. 

कोरोना योद्ध्यांंचा यथोचित सत्कार करून सन्मानपत्राने गौरविण्यात आले.

 ९४ आशाताईंना साडीचोळी भेट देत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमजदखान हैदरखान यांनी केले 

तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.