Ticker

6/recent/ticker-posts

*सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या विकासाचे हे प्रतिक*-पालकमंत्री अशोक चव्हाण ▪️किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण


*सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या विकासाचे हे प्रतिक*
-पालकमंत्री अशोक चव्हाण
 
▪️किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
 
किनवट : सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शासनाच्या 

सेवा सुविधा प्रभावीपणे पोहचल्या जाव्यात यासाठी वेळोवेळी आपण दक्षता घेत आलो आहोत. 

तेलंगनाच्या सिमेवर असलेल्या किनवट व माहूर तालुक्यात महसुली सेवा सुविधा गतीमान पध्दतीने पोहचाव्यात यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक

 बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी आदिवासी भागाला आपतकाल प्रसंगी तात्काळ संपर्कात राहावे यासाठी उपलब्ध असलेल्या

 विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देवू अशी घोषणा त्यांनी केली.
 
यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भीमराव केराम दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 
तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथून जि. प. अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, 

आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सांवत, महापौर मोहिनी येवनकर, 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, 

मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
 
जिल्ह्यातील 16 तालुके 8 उप विभागीय कार्यालये ई-प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे आज आपण वेगवेगळया ठिकाणी 

असूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत.  तेलंगना सीमेवर असलेल्या किनवट
 सारख्या आदिवासी 

भागातील हे कार्यालयही आता सक्षम व सुसज्ज झाले असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
 
*सामान्य जनतेच्या महसुली सेवेचे हे केंद्र ठरावे*
- महसुलमंत्री बाळासाहेब थोरात 
 
यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. 

सर्व सामान्य जनतेच्या महसुली सेवा सुविधा या अधिकाधिक सुलभ व्हाव्यात यासाठी महसुल विभाग प्रयत्नरत आहे. नागरिकांच्या सातबाऱ्यापासून ते पिक पेऱ्यापर्यत,

 विविध आपत्कालिन परिस्थतीच्या नियोजनापासून ते  तातडीने करावयाच्या योजनापर्यत कामाची जबाबदारी ही महसूल यंत्रणेवर आहे.
 यासर्व सोयी-सुविधा किनवट येथील जनतेपर्यत सुलभ पध्दतीने पोहचविण्यासाठी ही नवीन 

प्रशासकीय इमारत महसुली सेवेचे प्रतिक ठरेल असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील कोरोना काळातील 

सर्व आव्हाने समर्थपणे पेलून जिल्ह्यात इतर विकास कामांवरही तेवढेच प्रभावीपणे काम करुन दाखविले आहे. ऑनलाईन सातबारा, 8 अ, 2016 चे फेरफार, 

ई-पिक पाहणी, तलाठी गावे त्यांचा सज्जा ही सर्व कामे शिस्तबध्द पध्दतीने सुरु असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचा त्यांनी गौरव केला.  

यावेळी महसुल राज्यमंत्री अब्दूल सत्तार, आमदार भीमराव केराम यांची यथोचित भाषणे झाली. 

किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी प्रास्तविक केले. 

उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी आभार मानले.
         

या कार्यक्रमाचं औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिम जमाती पारधी, कोलाम, 

आदिवासी यांना बिरसा मुंडा क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीरी, आदिम घरकुल योजना,

 तीन चाकी - चार चाकी मालवाहू वाहन वाटप, आदिवासी महिला बचत गटांना बकरी पालन,

 कोविड मध्ये सेवा बजाविणाऱ्या  वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र,

 कोरोना लसीकरण जनजागृती ध्वनीचित्रफीत निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या कलावंतांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला. 
        
 यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्माणीवार, 

पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उप सभापती कपिल करेवाड, 

माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, अभय महाजन, कोंग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, 

शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,

शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, 

पंचायत समिती माजी उपसभापती 
गजानन कोल्हे पाटील,
 पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, 

सत्यनारायण सुंकारवार, नगरसेवक शिवा क्यातमवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल भंडारे, 

निवृत तहसिलदार उत्तम कागणे, बसपाचे जिल्हा प्रभारी प्रा. डॉ. आनंद भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
       

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, महम्मद रफिक, अनिता कोलगणे, 

महसूल कर्मचारी संघटनेचे गोविंद पापटवार, तलाठी संघटनेचे पांडुरंग हाके, रेड्डी, नितीन शिंदे, गजानन हिवळकर, संदीप पाटील आदिंनी परिश्रम घेतले.