Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे संत भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी किनवट दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी किनवट शहरात राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,


किनवट येथे संत भगवान बाबा जयंती उत्साहात साजरी


 किनवट शहर प्रतिनिधी(राज माहुरकर) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी किनवट 

शहरात राष्ट्रसंत श्री भगवान बाबा
 यांची जयंती 

उत्साहात साजरी करण्यात आली, तालुक्यातून व शहरातून 

शेकडो भगवान भक्त व समाज बांधव उपस्थित होते.

 त्यावेळी संत भगवान बाबा च्या जीवन चरित्रावर श्री सानप यांनी प्रकाश टाकला, 

गोकुंदा येथील बाळासाहेब ठाकरे चौकांमध्ये भगवानबाबा च्या प्रतिमेच्या 

पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. 

आणि किनवट शहरातील श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात हजारो 

भाविकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. 

त्यानिमित्त ह भ प नारायण महाराज माहाधापूर कर यांच्या

 प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

मनुष्याच्या अंगीकारातून द्वेत निघाल्याशिवाय जीवनामध्ये समाधान लाभणार नाही 

अन ते काढायचे असेल तर संताच्या विचारांची गरज आहे. 

असे आपल्या मधुर वाणीतून ह भ प नारायण महाराजांनी भाविकांना संबोधित केले.

यावेळी तालुक्यातील हजारो भक्तजन व समाज बांधवांची उपस्थिती होती.