Ticker

6/recent/ticker-posts

राजश्री पाटील यांची राज्य महिला उद्योजक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

राजश्री पाटील यांची राज्य महिला उद्योजक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
-------------------------------------------------------------------------------
नांदेड: राज्य महिला उद्योजक विकास परिषद ही संस्था उद्योग व्यापार व्यवसायातील 

महिलांसाठी कार्यरत असून सदर संस्थेच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना एकत्रित करणे, 

त्यांना येणा-या समस्या समजावून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे,

जागकित बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या विविध संधी निर्माण करून देणे 

आशा विविध विषयावर  काम करीत आहे.
या संस्थेच्या 

राज्य महिला अध्यक्ष पदी राजश्री हेमंत पाटील यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे 

संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 
            

     संस्थेच्या माध्यमातून उद्योगांच्या व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासाठी वित्तीय सहाय्य आणि गुंतवणुक,

 व्हेंचर कॅपिटल व प्रायव्हेट इक्विटी, व्यवसाय सल्लागार सेवा, मार्केटिंग, ब्रँडिंग, 

नवीन व्यवसाय उपक्रम उभारणे, स्टार्ट-अप्स आणि युवती महिला उद्योजकांना सहाय्य करणे या उद्देशाने 

श्री.चंद्रकांत साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. राजश्री पाटील गेली २५ वर्षांपासून महिला बचतगट स्थापना,

अर्थसाक्षरता शिबिराच्या माध्यमातून बँकिंग व व्यवहार प्रशिक्षण, 

व्यवसाय निवड व रोजगार उभारणी,
 निर्माण झालेल्या 

मालाची मार्केटिंग अशा विषयांवर  कार्य करीत आहेत. 

गोदावरी अर्बनचे माध्यमातून महाराष्ट्र,तेलंगाणा,आंध्रप्रदेश,कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात ४८००

 पेक्षा अधिक बचतगटांच्या माध्यमातून ४८००० पेक्षा जास्त 

महिला जोडल्या गेल्या आहेत.यासोबतच अनेक सामाजिक उपक्रमात त्या कायम अग्रेसर असतात.. 

राजश्री ताई नामवंत व्याख्यात्या असून 
त्यांची राज्यभर समाजप्रबोधन 
व्याख्यान होत असतात.

त्यांच्या कामाची दखल घेत संस्थेचे 
(SME Chember Of India) 

संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंके
 यांनी राजश्री पाटील 

यांची राज्य महिला उद्योजक विकास परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे.

या निवडी बद्दल राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष
 खासदार हेमंत  पाटील

एस.एम.ई.अध्यक्ष चंद्रकांत साळुंके व बचतगट चळवळीतील सर्व सहकारी 
महिलांचे आभार मानले.

ही निवड झाल्याबद्दल गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले व्यवस्थापकिय 

संचालक धनंजय तांबेकर व समूहातील समस्त संचालक पदाधिकारी, कर्मचारी  

तसेच विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.