Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ नुसार एकवीस प्रकारच्या दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी जागे व्हा दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचे आव्हान


*दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ नुसार एकवीस प्रकारच्या दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी जागे व्हा दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचे आव्हान*
 प्रतिनिधी 


दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’  भारत सरकारने दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण कायदा दि.२७ डिसेंबर २०१६ रोजी पारित केला.

दिव्यांग कायदा 2016 हा कायदा  1995 या पूर्वीच्या कायद्यात आवश्यक ते बदल व सुधारणा करून आता यापुढे दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी  2016 हा कायदा  सुधारित कायदा  दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यावर कृपा दृष्टी नसून तो त्यांचा हक्क आहे. हक्काचे सरंक्षण करणारा हा कायदा आहे. 
       दिव्यांग व्यक्तींना अपंग , विकलांग कधी दिव्यांग असे वेगवेगळ्या शब्दात गोंधळ होतो. त्यामध्ये शारीरिक अपंगत्व असेल तर तोच दिव्यांग समजला जातो. किंवा कधी रक्ताशी संबंधित काही आजार असतील तर त्यात दिव्यांग प्रकार कोणता ? असे विविध समस्या आपल्याला दिव्यांग व्यक्तींचे योग्य निदान करण्यासाठी आव्हानांना सामोरे जावे लागते. आज आपण दिव्यांग म्हणजे काय? आणि अपंगत्वाचे  2016 नुसार (दिव्यांग २१ प्रकार) कोणते? त्याची व्याख्या कायद्यात कशी आहे? याबद्दलची माहिती देत आहे. 
           दिव्यांग (अपंग)शब्द ऐकला की, आपल्याडोळ्यासमोर  हाताने , पायाने अधु असलेली व्यक्ती येते. परंतु हाताने किंवा पायाने अधु असलेलीच व्यक्ती दिव्यांग (अपंग) नव्हे हा एक अस्थिव्यंगाचा प्रकार झाला. मग याप्रमाणे शारीरिक, बौद्धिक, मानसिक दृष्ट्या  २१ दिव्यांग प्रकार आहेत. ते खालील प्रमाणे 
‘      *दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ नुसार दिव्यांग २१ प्रकार*
  *शारिरीक अपंगत्व*
                शारिरीक दिव्यांग्त्व (अपंगत्व) मध्ये शरीराचा कोणताही भाग किंवा अवयव निकामी होणे , शारिरीक वाढ खुंटणे , स्नायू ची विकृती या प्रकारच्या समस्या Physical  disability या व्यक्ती मध्ये आढळून येतात.

1. *अस्थिव्यंग Locomotor disability*
      स्नायू , माज्जासंस्थेचा त्रास किंवा दोन्हीमुळे होणाऱ्या परिणामी हलनचलन तसेच वस्तू हालचाल संबंधित क्रिया करण्यास अक्षम असणारी व्यक्ती म्हणजे  अस्थीव्यंग होय.
उदा. सांधे, स्नायू हाडे यामध्ये निर्माण झालेल्या दोषांमुळे हात, पाय या अवयवांच्या हालचालीवर व कार्यशीलतेवर येणाऱ्या मर्यादांना ‘अस्थिव्यंग’ असे म्हणतात. 
    2.) *कुष्टरोग Leprosy cured person*
‘कुष्ठरोग बरा झालेली व्यक्ती’ म्हणजे अशी व्यक्ती जी कुष्ठरोगातून बरी झाली आहे परंतु
हातापायातील संवेदना कमी होतात आणि पेरेसीसमुळे डोळे आणि पापण्या यातील संवेदना कमी होतात. स्पष्टविकृती आणि पॅरालिसिस त्वचेवर चट्टे , खवले , डाग असतात.

3. *मेंदूचा पक्षाघात Cerebral Palsy* 
       मेंदूचा पक्षाघात (‘सेरेब्रल पाल्सी’) म्हणजे मेंदूवर झालेला आघात वा अपघातामुळे मेंदूच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होऊन शरीराच्या एका किंवा अनेक भागांचे नियंत्रण कमी झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी विकलांगता व्यक्ती होय.
     4. *बुटकेपणा Dwarfism*
‘बुटकेपणा’ म्हणजे वैद्यकीय किंवा अनुवंशिक स्थिती, ज्यामुळे प्रौढाची उंची 4 फूट 10 इंच (147 सेंटीमीटर) किंवा त्या पेक्षा कमी राहते. अशी व्यक्ती म्हणजे बुटकेपणा या दिव्यांग प्रकारात येते.
     5.) *अविकसित मांसपेशी Muscular Dystrophy*
          अविकसित मांसपेशी' हा स्नायूंशी संबंधित आजार आहे. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील ठराविक भागातील, अवयवांतील स्नायूंचे तंतू कामचोर होऊ लागतात. किंबहुना नष्ट होऊ लागतात.

6.)  *आँसिड ह्ल्लाग्रस्त पिडीत Acid  Attack  Victims*
         आँसिड ह्ल्लाग्रस्त  पिडीत’ म्हणजे शरीराच्या ज्या भागावर ACID टाकून हल्ला केला आहे , ती जागा भाजल्यासारखी विद्रूप दिसते.
     7.) *अंध Blindness*
दोन्ही डोळ्याने काहीच दिसत नाही. वैद्यकीयदृष्ट्या व्याख्या खालीलप्रमाणे
दृष्टीचा पूर्णपणे अभाव किंवा
चांगल्या डोळ्यांची दृष्टीतीक्ष्णता 10/200 किंवा (3 ते 60) स्नेलन पेक्षा कमी असणे.
दृष्टीक्षेत्र मर्यादा 10 डिग्री अंश पेक्षा कमी दृष्टिकोनाचे क्षेत्र असणे.
     8). *अंशतः अंध (अल्पदृष्टी) Low-Vision*
एका डोळा निकामी असणे किंवा दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी असणे किंवा जवळचे व लांबचे न दिसणे. या
प्रकारातील दृष्टीदोष म्हणजे 'अंशतः अंध' होय. वैद्यकीयदृष्ट्या व्याख्या खालीलप्रमाणे
चांगल्या डोळ्यांची दृष्टीतीक्ष्णता 6/18 किंवा 20/60पेक्षा कमी आणि 3/60 किंवा 10/200 स्नेलन यापेक्षा कमी दृष्टीतीक्ष्णता असणे.
दृष्टीक्षेत्र मर्यादा 10 ते 40 डिग्री अंश पर्यंत दृष्टिकोनाचे क्षेत्र असणे.
     9. *कर्णबधीर Hearing Impairment*
          साधारणपणे 'कर्णबधीर' म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला ऐकायला येत नाही किंवा ऐकण्याची क्षमता कमी असते. अशा व्यक्तींना कर्णबधीर असे म्हणतात. ऐकायला न आल्यामुळे भाषा विकास होत नाही त्यामुळे बोलता येत नाही. काही व्यक्तींना ऐकायला येत नाही मात्र बोलता येते. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना बोलता येते मात्र ऐकण्याची म्हणजेच श्रवणशक्ती नष्ट होते किंवा कमी झालेली असते. काही व्यक्तींच्या बाबतीत अपघातामुळे कर्णबधीरत्व येते.वैद्यकीयदृष्ट्या  कर्णबधीर व्यक्तींची व्याख्याज्या व्यक्तीच्या चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास 60 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना ‘कर्णबधीर’ म्हणतात.
ज्या व्यक्तीच्या दोन्ही कानाचा श्रवणऱ्हास 70 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना ‘Deaf’ म्हणून ओळखले जाते.
      10)   *वाचा आणि भाषा अक्षमता Speech  and  Language  Disability*
          वाचा आणि भाषा अक्षमता म्हणजे स्वरयंत्र किंवा वागयंत्रणा (मुखअवयवातील बिघाड) किंवा मज्जासंस्थेतील कारणामुळे वाचा आणि भाषेच्या एक किंवा अधिक घाकांवर परिणाम होतो. त्यास वाचा आणि भाषा अक्षमता असे म्हणतात.

     11* *बौद्धिक अक्षमता* Intellectual Disability
       बौद्धिक अक्षमता म्हणजे ज्या व्यक्तींना तर्क लावणे , शिकण्यास समस्या , समस्येचे निराकरण आणि दैनंदिन व्यवहारातील वर्तन , कामे करण्यास कठीण जाते. अशा व्यक्तींना 'बौद्धिक अक्षमता' म्हणतात.
        12. *अध्ययन अक्षमता Specific Learning Disabilities*
         विशिष्ट शिकण्यातील अक्षमता (अध्ययन अक्षम) म्हणजे ज्यामध्ये बोलणे , लिहणे,वाचणे,शब्दलेखन करणे किंवा गणितीय क्रिया करण्यास अडचण येते. त्याचबरोबर भाषा समजण्यास व बोलण्यास कठीण जाते, या गोष्टींचा समावेश असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशिष्ट शिकण्यातील अक्षमता (अध्ययन अक्षम) असते. 

अध्ययन अक्षम मुल समजून घेण्यासाठी dyslexia, dysgraphia, dyscalculia, dyspraxia या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
    

 13). *स्वमग्नता 'Autism Spectrum Disorder*   स्वमग्नता ’ म्हणजे आयुष्याच्या पहिल्या तीन वर्षात दिसून येणारी गुंतागुंतीची  समस्या आहे.

 यामध्ये संप्रेषण, सामाजिक आंतर्क्रिया अक्षमता आणि कल्पनाशक्तीचा अभाव दिसून येतो. 'स्वमग्नता' म्हणजे स्वतःच्या कल्पनाविश्वात रमणे.
।    14). *मानसिक आजार Mental illness*

     मानसिक आजार' म्हणजे विचार, मनःस्थिती, आकलन, अभिमुखता किंवा स्मरणशक्तीचा एक मोठा आजार आहे, ज्यामुळे निर्णय, वर्तन,

 वास्तविकता ओळखण्याची क्षमता किंवा आयुष्याच्या सामान्य मागण्या पूर्ण करण्याची क्षमता यावर परिणाम होतो,

परंतु मंदपणाचा समावेश नाही ही अटळ किंवा अपूर्ण स्थिती आहे. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा विकास, विशेषत: बुद्धिमत्तेच्या असामान्यतेमुळे दर्शविला जातो.
   

15.)  *मल्टीपल स्क्लेरोसिस Multiple Sclerosis*
   
 मल्टीपल स्केलेरोसिस' म्हणजे प्रक्षोभक, मज्जासंस्थेचा रोग ज्यामध्ये मेंदूच्या मज्जातंतूंच्या पेशींभोवती म्युलिनचे आवरण असते 

आणि त्यामुळे मज्जासंस्थेची हानी होते, मस्तिष्क आणि मज्जासंस्थेतील मज्जातंतूंच्या पेशींची एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता कमी होते. 


हा विकार मेंदूतील चेता संस्थेतील (सेंट्रल र्नव्हस सिस्टम) संदेशवाहक चेतातंतूंवरील संरक्षक आवरण मायलिनला धक्का पोहोचल्यामुळे होतो.
    
   16). *कंपवात रोग Parkinsons disease* 
   

     कंपवात म्हणजेच पार्किन्सन्स डिसीज हा मेंदूतील सबस्टान्शिया नायग्रा नावाच्या भागातील पेशींची संख्या आणि कार्य कमी झाल्याने होणारा आजार आहे.माणसाच्या हालचालीतील सुबकता, डौल, आणि सफाई या रेणूमुळे प्राप्त होते. 

रेणूच्या अभावामुळे रोग्याच्या शरीराला कंप सुटतो,हालचाली संथावतात, स्नायू ताठर होतात.कंपवात झालेल्या रुग्णाचे वजन कमी होते
    
  17.) *हिमोफेलीया अधिक रक्तस्त्राव हिमोफिलिया* 
     

 हा अनुवांशिक रोग आहे, जो सामान्यतः पुरुषांवर परिणाम करतो परंतु स्त्रियां त्यांच्या नर मुलाकडे संक्रमित करतात, रक्ताच्या सामान्य गोठण्याच्या क्षमतेचा अभाव ज्यामुळे एखाद्या अल्पवयस्कास प्राणघातक रक्तस्राव होऊ शकतो. 
   
  18) *थॅलेसीमिया*' म्हणजे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे दिसणारा अनुवंशिक रक्तविकार आहे.
   

   19) . *सिकल सेल* डिससीज रोग' म्हणजे हीमोलिटिकडिस ऑर्डर, जी तीव्र अशक्तपणा, वेदनादायक घटना आणि संबंधित ऊतींचे आणि अवयवांचे नुकसान झाल्यामुळे विविध गुंतागुंत आहे; "हेमोलायटिक" म्हणजे लाल रक्तपेशींच्या नाश झाल्याच्या परिणामामुळे रक्तस्राव होते

      20.) *मज्जासंस्थेचे तीव्र आजार*
     न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर क्लिनिकली परिभाषित केलेला आजार आहे, जे मेंदूवर परिणाम करतात तसेच मानवी शरीरावर आणि मेंदू, पाठीचा कणा किंवा इतर नसामधील स्ट्रक्चरल, बायोकेमिकल किंवा विद्युतीय विकृतींमुळे विविध प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. चेतासंस्थेच्या क्षतीमुळे हा आजार निर्माण होतो.

21.) *बहुविकलांग Multiple    ऊपरोक्त २० दिव्यांग प्रकारतील एकापेक्षा जास्त अपंगत्व असेल एकत्रित असेल तर ‘बहुविकलांग’ Multiple Disabilities होय, यामध्ये deaf blindness समाविष्ट आहे. 

(कर्णबधीर+अंधत्व) असे एकत्रित अपंगत्व त्याला deaf blindness असे म्हणतात.
 असे दिव्यांग २१ प्रकार २०१६ दिव्यांग कायदा नमुद केले आहे या सर्व प्रकारच्या 

दिव्यांगानी लाभ घ्यावा असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले .