Ticker

6/recent/ticker-posts

भोकर पोलीसांची धाडसी कारवाई; ३६ लाखाच्या गुटखा नेत असलेला कंटेनर पकडला


भोकर : रात्र गस्तीवर असलेल्या भोकर पोलीस पथकाने भोकर शहरातील किनवट रस्त्याने हिमायतनगरकडे कायद्याने बंदी असलेल्या अवैध गुटखा नेत असलेला कंटेनर पकडला.

त्याची तपासणी केली असता 

सदरील कंटेनरमध्ये जवळपास ३६ लाखांचा अवैध गुटखा मिळून आल्याने चालक व अवैध गुटखा विक्रेत्याविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला 

असून ६० लाख ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवारत असलेले 

पो.उप.नि.अनिल कांबळे, सहा.पो.उप. नि.आर.एन. कराड,पो.कॉ.मोहन खेडकर,

भीमराव जाधव,नामदेव शिराळे,जमादार नामदेव जाधव यांचा समावेश असलेले पथक 

दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या रात्र गस्तीवर असतांना पहाटे ४:०० वाजताच्या दरम्यान भोकर शहरातून किनवट रस्त्याने वेगात जात असलेले

 एक १० चाकी कंटेनर दिसले.त्याचा संशय आल्यावरुन पो.उप.नि.अनिल कांबळे व गस्तीवरील या  पोलिस पथकाने

 त्या एच.आर.५५ यू ७०५४ क्रमांकाच्या कंटेनरचा पाठलाग करुन जिल्हा परिषद हायस्कूल परिसरा दरम्यान त्यास पकडले. 

कंटेनरमध्ये कोणते सामान आहे ? अशी चौकशी केली असता कंटेनर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

यामुळे सदरील कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला व त्याची तपासणी केली 

असता त्यात ११९ बोरीमध्ये ठेवलेला राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला 

जवळपास ३४ लाख २७ हजार २०० रुपयाचा अवैध गुटखा व २३ बोरींमध्ये जवळपास 

१ लाख ६५ हजार ६०० रुपये असा एकूण ३५ लाख ९२ हजार ८०० रुपयांचा कायद्याने बंदी जर्दापुडीयुक्त गुटखा आढळून आला.

यामुळे ३६ लाखाचा अवैध गुटखा आणि २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा 

एकूण ६० लाख ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कंटनरच्या चालकाची कसून चौकशी केली असता

 त्याने शाहिद इसाक असे त्यांचे नाव व तो पाठकोरी,ता.फेरोजपूर जिरका, जिल्हा मेवाड, 

राजस्थान येथील रहिवासी 
असल्याचे सांगितले. 

तसेच हा गुटखा हिमायतनगर 
येथील रिझवान सेठ 
यांचा असल्याचे सांगितले.

तर याबाबद अन्न भेसळ सुरक्षा विभागास माहिती देण्यात आली व सहा.पो.उप.नि. आर.एन.कराड 

यांनी फिर्याद दिल्यावरुन अन्न भेसळ नियम व नियमनाच्या विविध कलमांनुसार उपरोक्त 

दोन आरोपींविरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला 

असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि.अनिल कांबळे करीत आहेत.

भोकर पोलीसांच्या सदरील धाडसी कारवाईने अवैध गुटखा तस्कर व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे

 कर्तव्यदक्ष पो.उप.नि.अनिल कांबळे यांचे अनेकांतून अभिनंदन !

भोकर पोलीस ठाण्यात सेवारत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी 

पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अनिल कांबळे यांनी गेल्या 
पाच दिवसांपुर्वीच भोकरमध्ये झालेल्या

 धाडसी चोरी प्रकरणातील दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडील चोरीतील मोठी रक्कम जप्त केली.

हे गुन्हे प्रकरण ताजे असतांनाच काल त्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून लाखोंचा अवैध गुटखा पकडला.
यामुळे अवैध गुटखा तस्कर व 
विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

या दोन्ही गुन्हे प्रकरणात त्यांनी बजावलेले हे कर्तव्य पोलीस खात्यासाठी अभिमानास्पद आहे.

त्यामुळे पो.उप.नि.अनिल कांबळे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे