Ticker

6/recent/ticker-posts

'अन्नसुरक्षा दक्षता कमिटीची कर्तव्ये ' विषयावर वेबिनारला प्रतिसाद -एकच प्रकारचे रेशन कार्ड , धान्याचा एकच दर ठेवा :सुभाष लोमट-अन्नसुरक्षा अबाधित राहिली पाहिजे :सुभाष लोमटे वॉर्ड पातळीवर रेशन दक्षता समिती प्रभावी झाल्या पाहिजेत :सुभाष लोमटे


प्रेस नोट

'अन्नसुरक्षा दक्षता कमिटीची  कर्तव्ये ' विषयावर वेबिनारला प्रतिसाद 
---------------
एकच प्रकारचे रेशन कार्ड , धान्याचा एकच दर ठेवा :सुभाष लोमटे 
-----------------
अन्नसुरक्षा अबाधित राहिली पाहिजे :सुभाष लोमटे 
--------------
वॉर्ड पातळीवर रेशन दक्षता समिती प्रभावी  झाल्या पाहिजेत :सुभाष लोमटे 

पुणे :

क्षेत्रसभा समर्थन मंच, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप, 

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या संस्थांच्या वतीने 'अन्नसुरक्षा : दक्षता कमिटीची  कर्तव्ये 

' या विषयावर वेबिनारचे आयोजन 
करण्यात आले होते,

या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद  मिळाला. हा ऑनलाइन वेबिनार १६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता झाला.

अन्न सुरक्षा विषयातील अभ्यासक-कार्यकर्ते सुभाष लोमटे (औरंगाबाद) यांनी  मार्गदर्शन केले.असलम इसाक बागवान यांनी प्रास्ताविक केले.अन्नसुरक्षा जपणे  

आणि कुपोषण थांबविण्यासाठी क्षेत्रसभेमधील हा  महत्वाचा विषय विषय असून ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार अन्नसुरक्षेचे महत्व या मुद्दयांवर चर्चा झाली.

असलम इसाक बागवान,इब्राहिम खान,अल्लाद्दिन शेख यांनी संयोजन केले.

सुभाष लोमटे म्हणाले,' लोककल्याणकारी योजना 

या योजना न राहता तो प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारवर येत असल्याने त्याचा कायदा झाला पाहिजे.

अन्नसुरक्षा हा महत्वाचा विषय असला तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. 

वेगवेगळी रेशन कार्ड हा उपाय असणार नाही.कारण धान्य एकच असते,

किमती एकच असतात.रेशन दुकानदारांना यात भ्रष्टाचार करायला वाव मिळाला. 

वार्षिक १५ हजार उत्पन्नाचा  निकष कालबाह्य झाला आहे.

कष्टकऱ्यांना धान्य मिळणे
 याला प्राधान्य दिले पाहिजे. 

काही  निकष बदलण्याची गरज आहे.रेशन दुकानदाराच्या मार्फत यासंदर्भात  होणारे पैशाचे व्यवहार थांबले पाहिजे.

रेशनवरील धान्याचा भावफलक वस्तीत लागला पाहिजे.

ठरलेल्या प्रमाणात आपल्याला धान्य मिळते की नाही,हे तपासले पाहिजे.

धान्य घेतल्यावर पावतीचा 
आग्रह धरला पाहिजे. 

या मुद्यांवर अभ्यासवर्ग होण्याची गरज आहे.

महिन्यातून दक्षता कमिटीची किमान एक बैठक होणे गरजेचे आहे '. 

'कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने अन्नसुरक्षा कायदा अस्तित्वात आला.

अन्न सुरक्षेची गरज असलेल्या प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे.

अंत्योदय योजनेत मिळणारे धान्यच सर्वांना,त्याच दरात  मिळाले पाहिजे.

शेतकऱ्याकडून खरेदी करताना मात्र हमीभावातून खरेदी केली पाहिजे.

यातील रकमेचा फरक सरकारने उचलला पाहिजे.

अन्नसुरक्षा अबाधित राहिली पाहिजे आणि शेतकऱ्याला देखील  हमी मिळाली पाहिजे. 

रेशनच्या संदर्भात वॉर्ड पातळीवर दक्षता समिती झाल्या पाहिजेत आणि त्या प्रभावी असल्या पाहिजेत.

 सरकारकडून रेशन मागविताना  दक्षता कमिटीच्या मान्यता असल्या पाहिजेत.

रेशन दुकानदाराला दुखावणे हे जनतेला जमत नाही,

प्रत्यक्षात आपला कायदेशीर हक्क बजावताना घाबरता कामा नये,गाफील राहता कामा नये.एकटा माणूस प्रश्न सोडवू शकत नाही,

म्हणून वॉर्ड सभा,एरिया सभा,दक्षता कमिट्या प्रभावी कामगिरी बजावू शकतात',असेही लोमटे यांनी सांगितले.  

अल्लाउद्दीन शेख म्हणाले ,'राजकीय ,प्रशासकीय व्यवस्थेच्या खर्चासाठी रेशन दुकानदारांची व्यवस्था राबवली जाते आणि त्यातून भ्रष्टचाराची 

साखळी तयारी केली जाते .रेशन हा लोकाधिकार आहे ,त्याचा आग्रह धरला पाहिजे'. 

अस्लम बागवान म्हणाले ,' चर्चेनंतर मुद्द्यांचे आकलन झाल्यावर  

प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणे ही आवश्यक पायरी आहे 

,याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे .रेशन चळवळीला प्राधान्य दिले पाहिजे '.  
........................................ .........................    

  Media Co ordination :Prabodhan Madhyam (News Agency)
Gauri Bidkar,
*Dr.Deepak Bidkar* 9850583518