Ticker

6/recent/ticker-posts

*म. रा. जु. पे.ह. स.किनवटच्या वतीने गरजूना मदत*किनवट या आदिवासी बहुल तालुक्यात जंगलव्याप्त डोंगराळ भागात वाडी वस्ती गुडा तांड्यावर बहुजन समाज मोठ्या संख्येने राहतो.


म. रा. जु. पे.ह. स.किनवटच्या 
वतीने गरजूना मदत*

किनवट या आदिवासी बहुल तालुक्यात जंगलव्याप्त डोंगराळ भागात वाडी वस्ती  गुडा तांड्यावर बहुजन समाज मोठ्या संख्येने राहतो.

या तालुक्यात रोजगारासाठी कोणतेही कारखाने अथवा उद्योगधंदे  नाहीत.
राज्यात कोरोनाचे संकट अजुनही 
संपले नाही.

हातावरचे पोट असणाऱ्या गरिबांचे 
भयाण हाल होत आहेत. 
अशातच या कोरोना काळात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली दिसून येतात.

 यातच काही कुटुंबातील लोकांनी घरांतील कर्ता पुरुष गमावले आहेत. 

या भागात सिंचनाच्या सोयी सुविधाचा अभाव आहे.येथील शेतकरी विविध समस्यानी त्रस्त आहे.
शेतात कापुस ज्वारी तूर आदी पारंपरिक पिकाचे उत्पन्न ही खर्चा पेक्षा
 नेहमीच कमी होत असते.

परिणामी येथील शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. 

त्यामुळं शेतकऱ्याच्या  आत्महत्या 
घटना घडतं असतात.
या भागात भूमिहीन व मजूरवर्ग ही मोठ्या प्रमाणात असून यांच्या हाताला ही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. 

येथील आदिवासी समाज रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर करत असतात

मात्र सद्या कोरोनामुळे या वर्गाचीही  उपासमार होत आहे. 
अनाथ , अपंग , वेडसर , विधवा , दारिद्र्य रेषेतील , उपेक्षित , दुर्लक्षित वर्ग ही जिवंत राहण्याच्या हाल अपेष्टा भोगत आहे. 

वृद्ध माणसं ही वृद्धापकाळात कोणताही आधार नसल्याने भुकेल्या पोटासाठी  भयाण यातना सहन करत आहेत.
          

  अशा सर्व गंभीर बाबींचा विचार करून म. रा. जु. पे.ह. सं. तालुकाध्यक्ष गोपाल कन्नाके यांनी आपल्या संघटनेतील 
शिलेदारांना संघटनेच्या सोशियल मीडिया गृपद्वारे गरजूना अन्नपूर्णा किराणा सामान किट देण्याच्या  मदतीसाठी आव्हान केले असता.

या मानवतावादी सामाजिक उपक्रमाला संघटनेतील शिक्षकांनी  चांगला प्रतिसात दिल्यामुळे 

ऑनलाईन माध्यमातुन निधी गोळा करण्यात आला.जमा झालेल्या निधीतून दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या किराणा सामान वस्तूंची खरेदी करून 

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना किनवट द्वारे अन्नपूर्णा किट  वाटप करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.
      

 या उपक्रमा अंतर्गत तालुक्यांतील पिंपळगांव ( सि ) , कोलामपौड , भिलगांव , कनकी , मांडवी ,  नागापूर , सिंगोडा तांडा , दरसांगवी (सि) , लिंगी , सारखणी , 

सतीगुडा , घोटी , किनवट , गोकुंदा , अंधबोरी , नंदगांव तांडा , तल्हारी , ईरेगांव , सोनवाडी , इस्लापुर आदी गावांना भेटी देत 
कोरोना पासुन घ्यावयाची काळजी सांगत गावांतील गरजू कुटुंबांना एकूण  100 अन्नपूर्णा किराणा सामानाच्या किट वाटप करण्यात आले आहे. 
         
 सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल कन्नाके , बालाजी बबीलगेवार , गणेश शिराळ , नितीन सावरगावे , नागेश्वर बबिलगेवार ,

 प्रल्हाद गीते , परमेश्वर पटवारी  , रमेश राठोड , बाबराव मादसवार , कृष्णकांत सुंकलवाड , 
अनमोल गायकवाड , अरविंद खर्चे , शशिकांत कांबळे , अनिल जाधव , साजन उपवार , कमलेश आडे , प्रविण पिल्लेवार , सुमेध भवरे , 

 यशवंत बिरहाडे , प्रशांत केंद्रे , विष्णु मूनेश्वर , संग्राम झुडपे ,  पि.एस. नरवाडे , सुनील पंडीत , सुनील लासुरे , विश्वनाथ आडे , मालोजी शिंदे आदीनी खुप परिश्रम घेतले आहेत.