Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ,बोधडी,इंजेगाव व ईस्लापुर, शहरातील छुप्या पध्दतीने सुरु असलेला मटका व तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद कराअन्यथा पत्रकारांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करु..पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम यांचा इशारा


किनवट ,बोधडी,इंजेगाव व ईस्लापुर, शहरातील छुप्या पध्दतीने सुरु असलेला मटका व तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा


अन्यथा पत्रकारांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करु..पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम यांचा इशारा

किनवट (वार्ताहर) अरविंद सुर्यवंशी 

किनवट तालुक्यात सध्याला अवैध धंदे जोरात सुरु असुन तालुक्यातील ईस्लापुर,बोधडी,इंजेगाव व किनवट शहरात छुप्या पध्दतीने मटका सुरु आहे.

हे सर्व मटका बुकी व तालुक्यातील 
अवैध धंदे तात्काळ बंद न 
केल्यास किनवट 
तालुका मराठी पत्रकार संघाच्या 
वतीने लोकशाही मार्गाने 

आंदोलन  छेडण्याचा इशारा पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सुधाकर कदम यांनी दिला आहे.

तर विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षकानी या भागाकडे लक्ष देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

किनवट तालुक्यातील ईस्लापुर,बोधडी,इंजेगाव,जलधारा परिसरासह किनवट तालुक्यात 

मटका,गुटखा,अवैध रित्या देशी,
विदेशी दारु,गावठी दारु ,

जुगार अड्डे यासह अन्य अवैध
 धंदयाने कहर केला

 असुन तालुक्यात हे सर्व अवैध धंदे राजरोसपणे गेल्या अनेक महिण्या 
पासुन सुरु आहेत.

 या सर्व अवैध धंदयाला तालुक्यातील वाडी,तांडे,गुडा यासह अन्य गावचे 
नागरिक वैतागले असुन 

या अवैध धंदया बाबत व गावठी दारु बाबत अनेक गावच्या नागरिकांनी,
महिलांनी मागणी करुनही 

या अवैध धंदे करणायावर कुठलीच कारवाई होत नसल्याने या सर्व अवैध धंदे 
करणायाचे मनोबल वाढले आहे.
तालुक्यातील वाडी,

तांडयातील सुशिक्षीत बेरोजगार मुले मटका लावत असुन व्यसनाधीन होत आहे.

मटका सारख्या धंदयाने तर अनेकांचे 
संसार उधवस्त होत आहे.

हे सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी लवकरच किनवट तालुका मराठी पत्रकार संघाची महत्वपुर्ण 

बैठक घेणार असुन तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवा कडुन सर्कल निहाय अवैध धंदयाची माहीती घेवुन

 या अवैध धंदे विरोधात तालुक्यातील पत्रकारांच्या समवेत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक,

राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेवुन निवेदनाव्दारे मागणी करणार असल्याचे तालुकाध्यक्ष  सुधाकर कदम म्हणाले.

भेट घेवुन व मागणी करुनही तालुक्यातील अवैध धंदे बंद न केल्यास पत्रकारांच्या वतीने लोकशाही मार्गाने कोरोनाचे नियम पाळत 

आंदोलन करणार असल्याचे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम यांनी इशारा दिला आहे.